कंगनाच्या विधानाला भाजपसोबत जोडणे चुकीचे : आशिष शेलार

Kangana Ranaut - Ashish Shelar

मुंबई : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका करताना मुंबई (Mumbai) पाकव्याप्त काश्मीरसारखे वाटते, असे म्हटले होते . कंगनाच्या या वक्तव्यामुळे तिच्यावर सर्व स्तरांवरून टीका करण्यात येत आहे. अशातच भाजप (BJP) नेते राम कदम (Ram Kadam) यांनी कंगनाची पाठराखण करत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला होता. यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे .

कंगनाच्या विधानाला भाजपसोबत जोडणे चुकीचे असल्याचेही शेलार म्हणाले. राम कदम यांचे कंगनाबाबतचे मतही वैयक्तिक असल्याचेही ते म्हणाले. यावरून भाजप आमदार राम कदम यांच्या वक्तव्यापासून भाजपने हात झटकले आहे . राम कदम यांनी झाशीच्या राणीशी कंगना रणौतची तुलना केली होती. मात्र अखेर भाजपला या प्रकरणातून हात झटकावे लागले. कंगना रणौत हिने मुंबईला (Mumbai) शहाणपण शिकवण्याची गरज नाही, असे शेलार (Ashish Shelar) यांनी म्हटले आहे.

सुशांत सिंह (Sushant Singh Rajput) प्रकरणात वेगवेगळी वक्तव्ये करत प्रकरण संभ्रमित करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. कंगना हिने मुंबई किंवा महाराष्ट्राबद्दल कोणतेही वक्तव्य करत शिकवण्याचा प्रयत्न करू नये. याबद्दल सहमत असण्याचा प्रश्नच येत नाही. कंगना हिच्यामागे राहून वार करण्याचा प्रयत्न संजय राऊत यांनी करू नये. राम कदम यांच्या झाशीची राणी या कंगनाबद्दलच्या वक्तव्याबद्दल, ज्यांनी आपले व्यक्तिगत मत व्यक्त केले आहे, त्यावर ते खुलासा करतील, सर्व नागरिकांना सन्मानानं बघितलं पाहिजे. सन्मानाची भूमिका प्रत्येक व्यक्तीला बघण्याची असली पाहिजे. ही त्यांची भूमिका आहे त्याच्यात काही चुकीचे नाही, असे आशिष शेलार म्हणाले.

भाजप नेते राम कदम यांनी कंगनाचे ट्विट रिट्विट केले आहे. ‘शिवसेना नेत्याचं पुन्हा एकदा निंदनीय विधान. महाविकास आघाडीनं मुंबई पोलिसांवर स्वतःच्या स्वार्थासाठी दबाव आणला आहे. जेणेकरून सुशांतला न्याय मिळू नये. त्यांचा उद्देशच बॉलिवूड ड्रग माफियांना संरक्षण देण्याचा आहे आणि कंगना झाशीची राणी आहे. जी या धमक्यांना घाबरत नाही.’ असे म्हणत राऊत यांच्यावर निशाणा साधला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER