शिवसेनेला बाबरसेना म्हणणे अतिशय दुर्दैवी, त्यांना न्यायालयात उत्तर देऊ – संजय राऊत

Sanjay Raut

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगाने आज जाहीर केल्या. विधानसभेच्या 243 जागांसाठी बिहारमध्ये तीन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. पहिला टप्प्यात 28 ऑक्टोबरला, दुसऱ्या टप्प्यात 3 नोव्हेंबर तर तिसऱ्या टप्प्यात सात नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर 10 नोव्हेंबर रोजी या मतदानाचा निकाल घोषित होणार आहे. यावरून संजय राऊत (Sanjay Raut) यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.

कोरोनाच्या (Corona) संकटकाळात निवडणूक घेणे उचित होणार नाही. सध्या निवडणुकीपेक्षा कोरोनाची कामे करणे महत्वाचे आहे. आयोगाने या निवडणुका आता न घेता नंतर घ्याव्यात. बिहारच्या निवडणुका धर्मावर आणि जातीपातिच्या आधारावर होत असतात, असा आजवरचा इतिहास आहे. अशी टीकाही त्यांनी केली.

यावेळी त्यांनी अभिनेत्री कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) आरोपांवर भाष्य केले. मुंबईमुळे वैभव मिळालेले बाहेर जर जाणार नाही. मुंबईने सर्वानाच भरभरून दिले आहे. मुंबईच वैभव कधीही संपणार नाही. उलट झळकत राहणार आहे. कंगनाने केलेल्या आरोपांचे आम्ही न्यायालयात योग्य उत्तर देऊ. शिवसेनेला बाबरसेना म्हणणे अतिशय दुर्दैवी आहे. शिवसेनेनन महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी मोठा त्याग केला हे सर्वानाच माहिती आहे. असेही राऊत म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER