सत्तेपायी काँग्रेसच्या कारस्थानात शिवसेना सामील झाली, हे अतिशय वेदनादायी – चंद्रकांत पाटील

Uddhav Thackeray-Chandrakant Patil

मुंबई : महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी महत्वपूर्ण निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारने लागू केलेला मराठा आरक्षणाचा कायदा रद्दबातल ठरवला. यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. विरोधकांकडून राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात (SC) बाजू मांडण्यात अपयशी ठरल्याची टीका सुरू केली आहे. मराठा आरक्षण (Maratha Resrvation) कायदा रद्द करताना सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे, त्यात कायदा करण्याचा अधिकार केंद्र सरकारचा आणि राष्ट्रपतींचा असल्याचे नमूद केले आहे. आणि हाच धागा पकडत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी जनतेशी संवाद साधताना असा कायदा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करणार असल्याची माहिती दिली. यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chnadrakant Patil) यांनी निशाणा साधला आहे.

‘उद्धव जी, स्वतःचे अपयश झाकण्यासाठी हात जोडून पंतप्रधानांना प्रार्थना करतो, असे नाटक तुम्ही का करत आहात? ज्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसला आहात त्यांना मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छाच नाही आणि यासाठी केवळ तुम्हीच जबाबदार आहात, असे म्हणत ट्विटचंद्रकात पाटील यांनी केले आहे. तसेच ‘काँग्रेस सोबत जोडल्या गेलेल्या १०० सधन कुटुंबांची मराठा समाजाला आरक्षण मिळू नये अशी इच्छा आहे. आमच्या सारख्या गरीब कुटुंबांना या आरक्षणाची गरज होती पण काँग्रेस कधीही कोणालाही पुढे जाऊ देणार नाही. मराठा व्यक्तीच्या नावापुढे मागासवर्गीय लिहिलं जावं हे त्यांना नको आहे. आता शिवसेना सुद्धा केवळ सत्तेच्या लालसेपोटी काँग्रेसच्या या कारस्थानात सामील झाली आहे, हे अतिशय वेदनादायी आहे’, असेही पाटील म्हणाले. स्वत:चे अपयश झाकण्यासाठी तुम्ही केलेल्या विधानावरुन मराठा समाजात संताप व्यक्त केला जात आहे. तुम्ही सर्वोच्च न्यायालयात एका न्यायाधीशासमोर आपली बाजू मांडू शकला नाहीत, याची शिक्षा आता संपूर्ण मराठा समाजाला भोगावी लागणार आहे, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button