
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन आहे. त्यातच केंद्र सरकारने २५ मेपासून विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील कोरोनाची परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. अशावेळी रेड झोनमध्ये विमानसेवा सुरू करणे आणखी धोक्याचं ठरेल, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरवर म्हटले आहे.
ग्रीन झोन मधील प्रवाशांना रेड झोन मध्ये आणून संसर्ग/ प्रादुर्भावाचा धोका का वाढवायचा? व्यस्त विमानतळांना कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर सावधगिरीने चालविण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता पडणार आहे, त्यामुळे आपोआपच धोका ही वाढेलच, असे त्यांनी सांगितले आहे. तसेच रेड झोनमधील विमानतळ अशा परिस्थिती मध्ये सुरू करणे अत्यंत धोकादायक आहे. स्वॅब शिवाय प्रवाशांच्या नुसत्या थर्मल स्कॅनिंगचा काय फायदा? सध्या रिक्षा, टॅक्सी, बस सेवा मोठ्या प्रमाणात चालविणे शक्य नाही. पॉझिटिव्ह प्रवाशाला रेड झोनमध्ये आणून तेथील धोका वाढविणे हे चुकीचे आहे, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, देशात विमानसेवा सुरू होणार असली, तरी महाराष्ट्रात विमान वाहतूक सुरू न करण्याची राज्य सरकारची भूमिका आहे. राज्याच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, त्यामुळे राज्य सरकार विमानसेवा सुरू करण्यासाठी उत्सुक नाही.
ग्रीन झोन मधील प्रवाशांना रेड झोन मध्ये आणून संसर्ग/ प्रादुर्भावाचा धोका का वाढवायचा? व्यस्त विमानतळांना कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर सावधगिरीने चालविण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता पडणार आहे, त्यामुळे आपोआपच धोका ही वाढेलच!#PlanningOverAdHocism#MaharashtraGovtCares
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) May 23, 2020
रेड झोन मधील विमानतळ अशा परिस्थिती मध्ये सुरू करणे अत्यंत धोकादायक आहे.स्वॅब शिवाय प्रवाशांचे नुसतं थर्मल स्कॅनिंग चा काय फायदा? सद्या रिक्षा, टॅक्सी, बस सेवा मोठ्या प्रमाणात चालविणे शक्य नाही. पॉझिटिव प्रवाशाला रेड झोन मध्ये आणून तेथील धोका वाढविणे हे चुकीचे आहे.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) May 23, 2020
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला