महाविकास आघाडी सरकार कधी कोसळेल ते कळणारही नाही ; प्रवीण दरेकरांची टीका

Praveen Darekar

मुंबई :- भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi Govt) पुन्हा टीकास्त्र सोडले आहे. सह्याद्री अतिथीगृहातील स्लॅब कोसळला. तसेच राज्यातील आघाडी सरकार कधीही कोसळले. तेही कळणार नाही. तसे संकेत आहेत, असा दावा प्रवीण दरेकर यांनी केला आहे. ते प्रसार माध्यमांशी बोलत होते .

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पाच वर्षे मुख्यमंत्री राहिले आहेत. राज्यात त्यांना आणि भाजपला मोठा जनाधार आहे. त्यामुळे आम्हाला फ्रस्टेशन कशाचे असेल? फ्रस्टेशन फक्त सत्ताधाऱ्यांच्या चेहऱ्यावर आहे, असे दरेकर म्हणाले.

राज्यात 18 जिल्ह्यांमध्ये अनलॉक करण्यात आलं आहे. त्यावरही दरेकर यांनी भाष्य केले. अनलॉकबाबत काढण्यात आलेलं परिपत्रक ढोबळ पद्धतीने काढलं आहे. त्यात जिल्ह्यांबाबतचे निकष दिसत नाहीत, असं सांगतानाच मंदिर उघडण्याबाबतची सरकारची भूमिका विरोधी आहे. मंदिर उघडण्यासाठी सरकारचे मनोधैर्य का होत नाही?, असा सवालही दरेकर यांनी उपस्थित केला.

दरम्यान मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात फाऊंटनच्या वर असलेला मोठा स्लॅब कोसळल्याची घटना शुक्रवारी घडली. सह्याद्री अतिगृहात यावेळी बैठक सुरू होती. या ठिकाणी असलेल्या हॉल क्रमांक ४ बाहेरील स्लॅबसह झुंबर अचानक कोसळल्याने खळबळ उडाली. या घटनेवेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची बैठक सुरु होती. याचवेळी पीओपी स्लॅबसह झुंबर खाली कोसळल्याची घटना घडली. या घटनेत सुदैवानं कोणालाही दुखापत झाली नाही. यानंतर सह्याद्री अतिगृहात असलेल्या सर्वांना सुखरूप बाहेर हलवण्यात आले.

ही बातमी पण वाचा : मराठा आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकारची धूळफेक; आशिष शेलार यांचा आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button