विद्यार्थ्यांना आंदोलन करावे लागणे, हे दुदैवी आहे : अजित पवार

Ajit Pawar

पुणे : राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२० पुढे ढकलल्याने MPSC च्या विद्यार्थ्यांनी पुणे, कोल्हापूर, नाशिक, नागपूरमध्ये विद्यार्थ्यांनी रस्त्यावर येऊन आंदोलन केले. विद्यार्थ्यांना अशा प्रकारे आंदोलन करायची वेळ आली, हे दुर्दैवी आहे. विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ येऊ नये, यासाठी सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. २१ मार्चनंतरच्या परीक्षा या वेळापत्रकानुसारच होईल. MPSC प्रकरणी राजकारण करणे योग्य नाही. विद्यार्थ्यांना परीक्षा पुढे ढकलल्यामुळे जो त्रास झाला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटले. MPSC परीक्षेत राजकारण आणायचे काही कारण नाही. एमपीएससी ही स्वायत्त संस्था आहे.

यामध्ये इतरांनी राजकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. MPSCच्या विद्यार्थ्यांना सरकारचा पाठिंबा आहे. परंतु, दिशाभूल करण्याचा प्रयत्न काल झाला आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. मुख्यमंत्र्यांनी MPSC ला सांगून परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास सुरू ठेवण्याचे आवाहन दिले आहेत. MPSC प्रकरण व्यवस्थित हाताळायला हवे होते; मात्र परीक्षेबाबत निर्णय घेण्यात कमी पडल्याचे स्पष्ट मत आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले.

मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय शेवटचा आहे आणि यांच्या या निर्णयाला आमचे समर्थन आहे. ज्यांना राजकारण करायचे आहे, ते मागण्या करतीलच, असा टोला विरोधकांना त्यांनी लगावला. MPSC ने घेतलेल्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी दिलगिरी व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER