पुणे-नागपुरात आयसीयू व्हेंटिलेटर बेड मिळत नाहीत; मुंबईत अशी परिस्थिती नाही- राजेश टोपे

Rajesh Tope

मुंबई : देशभरातच कोरोनाने (Corona) हाहाकार केला आहे. गल्लीगल्ली, घराघरांत आता कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. राज्यात मृत्यू आणि कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. त्यातच अनेक शहरांत ऑक्सिजनचा तुटवडा, बेड मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी वस्तुस्थिती सांगितली आहे. ते म्हणाले, पुणेसह सहा ठिकाणी ऑक्सिजन उपलब्ध व्हावे यासाठी केंद्र सुरू होणार आहेत. तसेच, राज्यात काही शहरांत ऑक्सिजनचा काळा बाजार होत असल्याची माहिती मिळाली आहे.

लोकांना १९ रुपयांपेक्षा जास्त दरात कोणी ऑक्सिजनची विक्री करत असेल तर औषध प्रशासन विभागाकडे तक्रार करावी. काळा बाजार करणा-यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच, पुणे (Pune), नागपूरसारख्या (Nagpur) ठिकाणी बेडसाठी रुग्णांना फिरावे लागत असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी मान्य केले आहे. ते म्हणाले, राज्यात काही ठिकाणी पुणे, नागपूर शहरात आयसीयू व्हेंटिलेटर बेड मिळत नाहीत, हे खरे आहे. मुंबईत मात्र अशी परिस्थती नाही.

खासगी रुग्णालयात जास्त पैसे देऊन काही लोक बेड अडवून ठेवत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याची आरोग्य विभाग यंत्रणेला सूचना देण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागात डीपीडीसी आणि आमदार-खासदर फंड यातून आयसीयू बेड उपलब्ध करून देण्यास प्राधान्याने लक्ष दिले जाईल, असेही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER