शांतपणे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणं हे सरकारचं कर्तव्य- शरद पवार

Sharad Pawar

नवी दिल्ली : गेल्या १४ दिवसांपासून शेतकऱ्यांचं दिल्ली आणि दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा, माजी कृषिमंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी विरोधी नेत्यांसह राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची आज भेट घेतली. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना केंद्र सरकारच्या (Center Govt) निर्णयावर विरोधकांची भूमिका स्पष्ट केली.

राष्ट्रपती कोविंद (Ramnath Kovind) यांची भेट घेतल्यानंतर शरद पवार यांनी मीडियाशी संवाद साधताना शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सखोल चर्चा व्हावी आणि त्यांचे प्रश्न सोडवावेत, अशी मागणी केली.

‘थंडीच्या दिवसांत शेतकरी रस्त्यावर आहेत. अगदी शांतपणे ते आपली नाराजी सरकारसमोर मांडत आहेत. हा प्रश्न मार्गी लावणं हे सरकारचं कर्तव्य आहे’ असं म्हणत शरद पवार यांनी सरकारला कर्तव्याची आठवण करून दिली.

गेल्या १४ दिवसांपासून शेतकऱ्यांचं दिल्ली आणि दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू आहे. केंद्राकडून बुधवारी पाठवण्यात आलेला प्रस्तावही शेतकरी प्रतिनिधी मंडळाकडून फेटाळण्यात आला आहे.

या अगोदर केंद्रीय नेते आणि शेतकरी प्रतिनिधी मंडळ यांच्या झालेल्या पाच चर्चा निष्फळ ठरल्यात. तर मंगळवारी शेतकऱ्यांच्या गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या चर्चेतही कोणताही तोडगा निघू शकलेला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER