राज्य सरकारला कंटाळून डीजीपींनी प्रतिनियुक्तीवर जाणं दुःखद – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis.jpg

नागपूर :- राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जैस्वाल (Subodh Kumar Jaiswal) यांची सीआयएसएफच्या महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली. राज्य सरकारच्या कारभाराला कंटाळून डीजीपी केंद्रात प्रतिनियुक्तीवर चालले आहेत, अशी टीका विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. छोट्या छोट्या कामांतही सरकारचा हस्तक्षेप वाढत चालला आहे, असा आरोप फडणवीसांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना केला.

यावेळी फडणवीस म्हणाले की, राज्यात पहिल्यांदाच पोलीस महासंचालकांना विश्वासात न घेता पोलीस विभागाचा कारभार चालवला जात आहे. त्यामुळेच सुबोध जैस्वाल यांनी नाराज होऊन प्रतिनियुक्ती मागितली होती. ती केंद्र सरकारने स्वीकारली आहे. यामुळे राज्य सरकारने समजून घेतलं पाहिजे की पोलिसिंग गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येत असलं, तरीही पोलीस विभागाला स्वायत्तता दिली आहे. गृहमंत्र्यांकडे सुपरवायजरी (देखरेखीचं) काम आहे.

पण आता बदल्या असो, छोट्या छोट्या कामांतही हस्तक्षेप वाढत चालला आहे. त्यामुळेच अशाप्रकारे डीजीपींनी प्रतिनियुक्ती मागितली आहे. राज्यात पहिल्यांदाच असं घडलंय की सरकारच्या कारभाराला कंटाळून पोलीस महासंचालक गेले. पोलीस विभागाच्या मनोबलावर याचा परिणाम होईल, अशी प्रतिक्रिया देत देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार प्रहार केला.

ही बातमी पण वाचा : नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी फडणवीस-अजित पवार भेट होणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER