हा कोणत्या ‘किमान समान कार्यक्रमा’चा भाग आहे ? निरुपम यांचा टोमणा

Sanjay Nirupam slams Shiv Sena .jpg

मुंबई : राज्यपालांच्या अभिभाषणावरील अभिनंदन प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बुधवारी भाजपावर टीका करताना ‘बाबरी पडल्यावर येरेगबाळे पळून गेले, असे म्हणत शिवसेनेचे हिंदुत्व शेंडी-जानव्याचे नाही असे म्हणालेत. महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे नेते संजय निरुपम यांनी यावर ‘हा कोणत्या ‘किमान समान कार्यक्रमा’चा भाग आहे ?’ अशी टीका करत नाराजी जाहीर केली.

संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी ट्विट केले- “महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काल विधानसभेत बाबरी पाडल्याचा आनंद साजरा केला आणि तिथे उपस्थित काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार भाषणाचा आनंद घेत होते. हा कोणत्या किमान समान कार्यक्रमाचा भाग आहे?”.

“हे ओवेसींच्या विषारी झाडाला खतपाणी घालण्यासाठी पुरेसं नाही का?,” अशी विचारणादेखील संजय निरुपम यांनी केली.

उद्धव ठाकरे म्हणाले होते

“तुम्ही बाळासाहेबांची आठवण वेळोवेळी काढलीत त्याच्याबद्दल मी आपला आभारी आहे, किमान तुम्ही त्यांना तरी विसरला नाहीत. विसरला नसाल तर त्याचे हिंदुत्व लक्षात ठेवा. त्यांचे हिंदुत्व शेंडी-जानव्याचे नव्हते. बाबरी पडल्यावर येरेगबाळे पळून गेले. एकटे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे उभे राहिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER