उपमुख्यमंत्र्यांच्या महापूजेला विरोध करणारे वारकरी नसून संघाचे चमचे – अमोल मिटकरी

अकोला :- कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता कार्तिकी यात्रेनिमित्त वारकऱ्यांना पंढरपुरात येण्यास शासनाने निर्बंध घातले. वारकऱ्यांना विरोध करत उपमुख्यमंत्री कार्तिकीची शासकीय महापूजा कसे करू शकतात. हा दुजाभाव शासनाने करू नये. वारकऱ्यांना वारी नाही तर उपमुख्यमंत्र्यांनीही वारी करू नये. जर सरकारने वारकऱ्यांना परवानगी दिली नाही तर, निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा वारकरी संप्रदायाने दिला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी  (Amol Mitkari) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

ही बातमी पण वाचा : ‘ठाकरे सरकार’ हिंदुत्वाच्या विरोधी असल्याची बोंब ठोकणे हे सरळ सरळ ढोंग – शिवसेना

महापूजेला विरोध करणारे वारकरी नसून संघाचे चमचे आहेत. वारकऱ्यांच्या नावाखाली पूजेला विरोध करणाऱ्या या भाजप कंपनीपासून वारकऱ्यांनी सावध असावे, असं टीकास्त्र राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी सोडलं आहे. ट्विट करत त्यांनी भाजपवर (BJP) हल्लाबोल केला आहे.

उपमुख्यमंत्र्यांचा कार्तिकी एकादशीच्या श्रीविठ्ठल महापूजेला विरोध करणारे वारकरी नसून संघाचे चमचे आहेत. वारकऱ्यांच्या नावाखाली विठ्ठल पूजेला विरोध करणाऱ्या या भाजपा कंपनीपासून वारकऱ्यांनी सावध असावे. “तुका म्हणे खळ l करू समयी निर्मळ ll, असा टोलाही मिटकरींनी कथित वारकऱ्यांना लगावला आहे.

ही बातमी पण वाचा : उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रिपद पाच वर्षे टिकावे; पायी वारी करत प्रसाद घेऊन ते मातोश्रीकडे रवाना

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER