मी कोरोनावरील लस घेतली हे खरे नाही – शरद पवार

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला (Serum Institute) भेट दिली. त्यांच्या या भेटीमुळे त्यांनी कोरोनाची लस घेतल्याची चर्चा वा-यासारखी पसरली. यावर पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी लसीसंदर्भातील हकिकत सांगितली.

शरद पवार यांनी सांगितले की, मी कोरोनावरील लस घेतली असे लोक म्हणत आहेत; परंतु ते खरं नाही, त्यांच्याकडे (सीरम इन्स्टिट्यूट) आता रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी (आरबीसीजी ट्रिपल बुस्टर) लस आहे. ती लस आज मी घेतली आहे. माझ्यासोबत माझ्या स्टाफनेदेखील ही लस घेतली आहे.

सीरम इन्स्टिट्यूटची कोरोनावरील लस यायला जानेवारी उजाडेल.या भेटीत पवारांनी सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार करण्यात येत असलेल्या कोरोनावरील लसीच्या कामाची माहिती घेतली. गेल्या काही दिवसांमध्ये शरद पवारांनी सीरम इनस्टिट्यूटला दिलेली ही दुसरी भेट आहे. १ ऑगस्टलादेखील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये  येऊन कोरोनावरील लस बनवण्याचं काम कसं सुरू  आहे याची माहिती घेतली होती, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER