हक्कभंगाबाबत दुहेरी भूमिका घेता येणार नाही – देवेंद्र फडणवीस यांची टीका

Devendra Fadnavis.jpg

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि अभिनेत्री कंगना यांच्याविरुद्ध आज विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात आले. अर्णब गोस्वामी यांच्याबाबतच्या हक्कभंगाबाबत टीका करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  म्हणाले की, हक्कभंगाबाबत दुहेरी भूमिका घेता येणार नाही.

याबाबत माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, अर्णब गोस्वामी यांनी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख नीट केला नाही म्हणून हक्कभंग आणता ! त्याचवेळी ‘सामना’सारख्या दैनिकात राज्यपालांचा उल्लेख कसा होतो? पंतप्रधानांचा उल्लेख कसा होतो? याचाही विचार करण्याची गरज आहे. दुटप्पी भूमिका असू शकत नाही, सारखी भूमिका घेतली पाहिजे. अभिनेत्री कंगनाने मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राचा अपमान केला, या आरोपात तिच्याविरुद्ध हक्कभंग आणला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER