मराठा समाजास ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण देणे शक्य नाही, काँग्रेसचे मंत्री आक्रमक

Uddhav Thackeray & Vijay Vadettiwar

मुंबई : मराठा समाजाच्या विकासासाठी राज्य सरकारने भरीव निधीची तरतूद केल्यानंतर आता काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. विजय वडेट्टीवार यांनी थेट मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांनाच आवाहन करत ५२ टक्के असलेल्या ओबीसी समाज नाराज होणार नाही याची काळजी घ्या, असा सल्ला दिला आहे.

वडेट्टीवार म्हणाले, मराठा समाजाला एडब्ल्यूएसमधून आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याला सगळ्यांनी पाठिंबा दिला आहे. मराठा समाजाला विरोध नसल्याचं मी कालच स्पष्ट केलं आहे. पण राज्यात ५२ टक्के ओबीसी आहेत. त्यांनाही न्याय मिळायला हवा, अशी आमची भूमिका आहे. ओबीसींनाही न्याय मिळावा म्हणून अनेक ओबीसी नेत्यांनी आज माझ्याशी भेट घेतली. त्या सर्वांना घेऊन मी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेणार आहे. ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात निधी मिळाला पाहिजे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असून आम्हाला मुख्यमंत्री न्याय देतील अशी आशा आहे, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं. तसेच याच मुद्द्यावर उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

ओबीसी समाज नाराज होता कामा नये, याचा विचार मुख्यमंत्र्यांनी करावा असंही ते म्हणाले. ओबीसी महामंडळ आणि वसंतराव नाईक महामंडळ यांना निधी मिळाला पाहिजे. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे पण त्याचवेळी ओबीसींवर अन्याय नको इतकीच आमची मागणी आहे, असेही वडेट्टीवार यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER