दारू पिणाऱ्यांना ‘पटियाला पेग’ माहित नाही असे शक्यच नाही.. काय आहे ‘पटियाला पेग’चा इतिहास?

Maharashtra Today

बॉलीवूडच्या अनेक गाण्यात तुम्ही ‘पटीयाला पेग'((Patiala Peg)) नाव ऐकलं असेल. हे नाव दारुशी जोडलं गेलंय. भारतातील ही एक प्रसिद्ध ड्रिंक आहे. मदिरापान करणाऱ्यांमध्ये पटिलाला पेगला विशेष महत्त्व आहे. अनेकांना हे नाव माहिती असलं तरी नाव आलं कुठुन याबद्दल अनेकांना माहिती नाही. पटियाला पेगला’भुपेंद्रसिंह’ (Bhupendrasingh)यांचा अविष्कार मानलं जातं. इतकंच नाही तर जेव्हा आयरिश खेळाडूंना त्यांना हा पेग पाजला तेव्हा त्यांनी भान हरपलं असल्याचंही बोललं जातं,

पोलो खेळात भूपेंद्रसिंहांची होती पकड

तो काळ भारताच्या गुलामीचा होता. इंग्रजांच्या ताब्यात भारताची सत्ता होती. लोकांच्या जगण्यावर अनेक प्रकारचे प्रतिबंध होते. पण दुसऱ्या बाजूला पंजाबच्या पटियालातला एक असा राजा होता ज्याच्यावर निर्बंध लादणं इंग्रजांनाही जमलं नाही. नाव होतं ‘महाराजा भुपेंद्रसिंह.’ त्यांच्या ऐशोआरामाच्या जीवनशैलीबद्दल ते प्रसिद्ध होते. मौल्यावान दागिणे, महागडे पकडे, स्टालिश गाड्या आणि ३०० हून अधिक राण्या त्यांच्याकडे होत्या.

इतकंच नाही तर त्यांना खेळाची विशेष आवड होती. पोलो खेळणं त्यांना प्रचंड आवडायचं. पोलो खेळण्यासाठी त्यांच्याकडे शीख योद्ध्यांचा एक संघ होता. ही एखादी सामान्य पोलो टीम नव्हती. या टीमच्या प्रत्येक खेळाडूचीवेगळी ओळख होती. त्यांच्यासमोर कोणतीच टीम टीकाव धरु शकत नसे. त्यांनी पोलोमध्ये एक नवा खेळ आणला होता. नाव दिलं होतं ‘स्कल पेंग्गिंग’ म्हणजेच शत्रुच्या कवटीसोबत ते पोलो खेळायचे. म्हणजे शत्रुचं शिर मैदानात ठेऊन त्यांच्याशी खेळलं जायचं. जगभरात या खेळाबद्दल चर्चा झाली. आयरिश संघाला या खेळाबद्दल कळालं. त्यांनी भुपेंद्रसिंहांच्या संघासोबत मुकाबला करण्याचा निर्णय घेतला. यानंतर काही दिवसातच आयरिश संघासोबत पटियालाच्या पोलो टीमनं स्पर्धेचं आयोजन केलं. भुपेंद्रसिंहांनी आयरिश संघाला भारतात पाठवण्यात सांगितलं.

आयरिश टीम इतकी दारु कुणी पिऊ शकत नाही

महाराजा भुपेंद्रसिंह यांच्या सोबत स्पर्धेची चर्चा सगळी कडे होती. आयरिश टीमला कुणालाच पाहिलं नव्हतं भुपेंद्रसिंहांच्या संघाला आयरिश खेळाबद्दल काही कल्पना नव्हती. पटियाला महालात येण्याचं आयरिश संघाला आमंत्रण होतं. अंगाने धडधाकड आणि मजबूत खेळाडू बघून सर्वांनाच त्यांची दहशत जाणवली. काही वेळेनंतर आयरिश संघ महालात पोहचला. आयरिश खेळाडूं इतकी दारु कुणी पित नाही ही गोष्ट जगभरात प्रसिद्ध होती. वाटेल तितकी दारु पिली तरी त्यांना शुद्ध सांभाळता यायची. गोरे खेळाडू पाहिजे तितकी दारू पिऊ शकतात हे कळल्यानंतर त्यांनी नव्या ड्रिंकचा अविष्कार केला. ज्यामुळं भुपेंद्रसिंहांच्या संघातल्या खेळाडूंच्या मनातून आयरिश खेळाडूंची दहशत निघून जाईल. या ड्रिंकला कोणतचं नाव नव्हतं. इतर ड्रिंकच्या तुलनेत ही डबल साइझने होती. स्वतःची ताकद दाखवण्यासाठी आयरिश खेळाडूंनी कसलाच विचार न करता दारू प्यायला सुरुवात केली.

असं म्हणतात की त्या रात्री आयरिश खेळाडूंनी दारु घेतली आणि ती चढली अशी की उतरायचं नावच घेत नव्हती.

आयरिश संघ नशेत होता त्यांना खेळण्याची हिंमत होत नव्हती. स्वतःचा सन्मान राखण्यासाठी त्यांच्यासाठी कोणत्याही किंमतीत खेळणं गरजेचं होतं. हळू हळू त्यांची हालत सुधारली त्यांनी पोलो मॅच खेळण्यास स्वतःला तयार केलं. थोड्याच वेळात महाराज भुपेंद्रसिंह यांची टीम पोहचली. दोन्ही संघांसाठी हा सामना प्रतिष्ठेचा होता. महाराजा भुपेंद्रसिंह यांनी आयरिश टीमचा पराभव केला. पराभव झाकण्यासाठी आयरिश संघानं महाराज भुपेंद्रसिंह यांच्यावर दारुचे मोठे पेग बनवल्याचा आरोप केला. यावर उत्तर देताना महाराज भुपेंद्रसिंह म्हणाले ‘पटीयाला पेग मोठेच असतात.’ तेव्हापासून पटियाला पेग हे नाव रुढ झालं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button