बाबर लक्षात ठेव .. ती फक्त इमारत नाही तर राम मंदिर आहे ; कार्यालयावर हातोडा पडताच कंगनाचे ट्विट

Kangana Ranaut - Babar - Ram Mandir

मुंबई : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना राणौतच्या (Kangana Ranaut) जुहू येथील कार्यालयामधील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी पोहोचले आहेत. यानिमित्तान कंगनाने ट्विट करत कारवाईवर टीका केली आहे.

कंगनाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “मणिकर्णिका फ़िल्म्समध्ये पहिला चित्रपट अयोध्येची घोषणा झाली होती. ही माझ्यासाठी इमारत नाही तर राम मंदिर आहे. आज इथे बाबर आला आहे. आज इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. राम मंदिर पुन्हा पाडलं जाईल, पण लक्षात ठेवा राम मंदिर पुन्हा उभं राहील..जय श्री राम”, असे ट्विट कंगनाने केले .

दरम्यान कंगनाने शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका करताना मुंबई (Mumbai) पाकव्याप्त काश्मीरसारखे वाटते, असे म्हटले होते . कंगणाच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यापार्श्वभूमीवर कंगना आज मुंबईत दाखल होणार असून तिने प्रवासाला सुरुवात केली आहे.

ही बातमी पण वाचा : कंगनाच्या मुंबईतील कार्यालयाच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER