राष्ट्रवादीच एवढी बैचेनी का वाढली आहे हेच कळत नाही ; निलेश राणेंचा घणाघात

Jayant Patil - Nilesh Rane

मुंबई : न्यायालयाने सीबीआयमार्फत अनिल देशमुख यांचे चौकशीचे आदेश दिले. त्यात महाविकास आघाडीच्या पोटात दुखायचे कारण काय? तुमचे हात साफ असतील तर सुटाल, असे सांगतानाच राष्ट्रवादीच एवढी बैचेनी का वाढली आहे हेच कळत नाही, अशा शब्दात भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडले .

उद्या आपलंही नाव येईल म्हणून राष्ट्रवादीवाले बिथरले आहेत. चौकशी झाली तर कुठपर्यंत नावं जातील याची त्यांना भीती वाटतेय. त्यामुळेच राष्ट्रवादीला चौकशी होऊ नये असं वाटतं, असा दावाही राणे यांनी केला .

सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घर आणि कार्यालयाची झाडाझडती घेतली. त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सीबीआय देशमुखांच्या घरी बाहेरून कागदपत्रे घेऊन गेली होती, असा गंभीर आरोप केला आहे. पाटलांच्या या आरोपाचा राणे यांनी समाचार घेतला .

जयंत पाटील हे अनिल देशमुख यांच्या घराचे वॉचमन आहेत का? ज्यांचं घर आहे, जे त्या घरात राहत आहेत. ते आरोप करत नाहीत आणि ज्यांचा घराशी काहीच संबंध नाही, ते आरोप करत आहेत. बरं घरात कोण जातं आणि कोण येतं हे वॉचमनशिवाय कोण सांगू शकतो, त्यामुळे पाटील यांना ही माहिती असल्याने कदाचित ते देशमुखांच्या घरचे वॉचमन असावेत, असा टोला राणे यांनी लगावला. जयंत पाटलांनी डोकं लावून बोलावं. तुम्हाला हे शोभत नाही, असं सांगतानाच परमबीर सिंग यांना त्यावेळी मांडीवर घेऊन बसला होता. आता ते व्हिलन झाले आहेत काय? असा सवालही त्यांनी केला.

निलेश राणे यांनी यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊतांवरही टीका केली. राऊतांना केंद्र सरकार आणि भाजपवर टीका केल्याशिवया पगार मिळत नाही. राऊतांविरोधात एका महिलेने तक्रार केली आहे. अनेक महिन्यांपासून ही महिला न्याय मागत आहे. त्यांच्याकडे राऊतांविरोधात पुरावे आहेत. मग कारवाई का होत नाही? असा सवाल त्यांनी केला. एका महिलेला छळणारा व्यक्ती ताठमानेने फिरू कसा शकतो? त्यांना अटक झालीच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

राणे यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या चौकशीच्या मागणीचा पुनरुच्चार केला. अनिल परब मातोश्रीचे एजंट आहेत. ते या गुन्ह्यात भागीदार आहेत. परब मातोश्रीला पैसे पोहोचवत होते. मातोश्री सुद्धा या गुन्ह्यात आहे. परब हे पाईपलाईनमध्ये आहेत. ते सुटू शकत नाहीत, असे ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button