वैद्यकीय परीक्षा रद्द करणे किंवा ऑनलाईन घेणे संयुक्तिक नाही; अमित देशमुखांच्या सूचना

Amit Deshmukh

मुंबई :- कोरोना (Corona) प्रादुर्भावामुळे अनेक विषयांच्या पदवी परीक्षा रद्द अथवा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. यावर आता वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांनीही परीक्षा रद्द किंवा ऑनलाईन पद्धतीने घेण्याची मागणी केली. मात्र, वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लेखी तसेच प्रात्यक्षिक परीक्षा रद्द करणे किंवा ऑनलाइन घेणे नियमाला अनुसरून नाही. यात न्यायालयानेही परवानगी दिलेली नाही. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेतली जाईल, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री यांनी ट्विट करून स्पष्ट केले आहे.

विद्यार्थी आणि पालकांनी ही बाब समजून घेऊन परीक्षेला सामोरे जाण्यासाठी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन अमित देशमुख यांनी केले आहे. “२ जूनपासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलून १० जूनपासून घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. कोविड-१९ प्रादुर्भावात वाढ न झाल्यास या परीक्षा सुरक्षित वातावरणात पार पाडण्याचे नियोजन आरोग्य विद्यापीठ व वैद्यकीय महाविद्यालयांचे आहे. या परीक्षा रद्द कराव्यात, त्या पुढे ढकलाव्यात किंवा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात याव्यात, अशी मागणी काही विद्यार्थी करत आहेत. वास्तविक पाहता वैद्यकीय महाविद्यालयाकडून शिक्षण घेणारे विद्यार्थी भविष्यात डॉक्टर होऊन जनतेच्या आरोग्याची काळजी घेणार आहेत. अशा अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रात भविष्यात काम करण्याची जबाबदारी घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करणे किंवा ऑनलाईन घेणे संयुक्तिक ठरत नाही. केंद्रीय नियामक मंडळालाही ते मान्य नाही; शिवाय उच्च न्यायालयानेही ही बाब नाकारली आहे. त्यामुळे परीक्षा घेणे अनिवार्य ठरते आहे.” असे अमित देशमुख यांनी म्हटले आहे.

“सध्या कोविड-१९ प्रादुर्भावाची परिस्थिती आहे, हे जरी खरे असले तरी या कारणास्तव वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लेखी तसेच प्रात्यक्षिक परीक्षा रद्द करणे किंवा ऑनलाईन घेणे नियमाला अनुसरून नाही आणि न्यायालयानेही यास परवानगी दिलेली नाही.” असेही अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी स्पष्ट केले आहे.

Disclaimer:-बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button