खिजगणतीत नसलेल्या पृथ्वीबाबांना मोदी एनपीए वाटणे स्वाभाविक; भाजपची विखारी टीका

Prithviraj Chavan - PM Narendra Modi - Atul Bhatkhalkar

मुंबई : कोरोना (Corona) प्रादुर्भावामुळे देशात हाहाकार माजला आहे. अशा वेळी कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका काँग्रेस (Congress) अध्यक्ष सोनिया गांधींपासून (Sonia Gandhi) अनेकांनी केली. राहुल गांधी (Rahul Gandhi), पी. चिदंबरम (P. Chidambaram) यांनी तर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. अशा वेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी पंतप्रधान मोदी हे बिनकामाची मालमत्ता (एनपीए) (NPA) असल्याचं म्हटलं होतं. त्यावर आता भाजपचे (BJP) आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी जहरी टीका केली.

“महाराष्ट्र कॉंग्रेसच्याही खिजगणतीत नसलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पंतप्रधान नरेंद्र मोदींना नॉन परफॉर्मिंग असेट (एनपीए) म्हणाले. यूपीएच्या कणाहीन पंतप्रधानांच्या काळात 2G, 4G, जिजाजी… असे अनेक ‘परफॉर्मन्स’ पाहिलेल्या पृथ्वीराज यांच्यासारख्या नेत्याला मोदी NPA वाटणे स्वाभाविकच.” असा टोला भातखळकर यांनी चव्हाणांना लगावला.

तसेच, अमरावतीत रेमडेसिवीरचा (Remdesivir) काळा बाजार करणाऱ्या ‘वाझे’ला कोणाचा आशीर्वाद? मोठे मासे वाचवण्यासाठी चोरांचा सखोल तपासच केला नाही. या प्रकरणी आवाज उठवणारे भाजपा प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांच्यावर गुन्हे दाखल केले. पालकमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur), वसुली सरकारचा निषेध करत असल्याचं म्हणत त्यांनी दुसरे ट्विट केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button