हिंदूंच्या सुरक्षेची जबाबदारी आता माझ्या खांद्यावर- इम्तियाज जलील

Imtiyaz Jalil

औरंगाबाद :- औरंगाबादमधील तमाम हिंदूंच्या सुरक्षेची जबाबदारी माझी आहे, असं औरंगाबादचे नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. मी केवळ मुस्लिमांचा खासदार नाही तर सर्व धर्मीयांचा खासदार आहे, असं म्हणत जलील यांनी मुस्लिम खासदार म्हणून टीका करणाऱ्यांवर ताशेरे ओढले.

ही बातमी पण वाचा : मुस्लिमांनी मत न दिल्याने माझा दोन्ही ठिकाणी पराभव झाला! – प्रकाश आंबेडकर

शिवसेना गड मानला जाणाऱ्या औरंगाबाद मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील खासदार म्हणून निवडून आले. शिवसेनेच्या पराभवानंतर ते पुन्हा एकदा हिंदूंच्या सुरक्षेचा मुद्दा पुढं करत आहेत; मात्र हे चुकीचं आहे. त्यांच्याकडे दुसरा मुद्दाच राहिलेला नाही, असं जलील यांनी म्हटलं आहे. निवडणूक निकालानंतर अफवा पसरवून शहराची शांतता बिघडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलिसांनी संबंधितांवर कडक कारवाई करावी. शहरात शांतता राखून औद्योगिक विकासासह रेल्वे व विमान कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली .

ही बातमी पण वाचा : ‘वंचित’मध्ये काहींनी आघाडी धर्म पाळला नाही त्यांची हकालपट्टी करणार : इम्तियाज जलील

दरम्यान खैरे आमचे मोठे बंधू… माजी खासदार चंद्रकांत खैरे हे २० वर्षांपासून माझे खासदार होते. आता मला कौल मिळाला आहे. शहराच्या विकासासाठी त्यांनी आखलेले अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तयार आहोत. त्यांचे मार्गदर्शन घेण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.