हायकोर्टाचा निर्णय : कारमध्ये एकटे असाल तरी मास्क लावणे बंधनकारक, अन्यथा दंड

नवी दिल्ली : मास्क (Mask) वापरण्याबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. तुम्ही घरी किंवा कारमध्ये एकटे असाल तरी मास्क लावणे बंधनकारक आहे. नाही तर दंड आकारला जाईल, असा मोठा निर्णय उच्च न्यायालयाने (High Court) दिला आहे.

कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढत असलेली रुग्णसंख्या लक्षात घेता दिल्ली उच्च न्यायालयानेही त्याची गंभीर दखल घेतली आहे. कारमध्ये जर आम्ही एकटे असू तर मास्क लावले नाही म्हणून दंड वसूल केला जाऊ नये, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. त्यावर कोर्टाने सुनावणी करताना कार भलेही कोणत्याही एका व्यक्तीची असेल; मात्र ती एक सार्वजनिक जागाच आहे. मास्क सुरक्षा कवचासारखं आहे. त्याद्वारे कोरोना संसर्ग रोखता येतो. त्यामुळे तुम्ही घरी असा किंवा कारमध्ये मास्क लावलाच पाहिजे, असं कोर्टानं म्हटलं आहे. जस्टिस प्रतिभा एम. सिंह यांनी हा निर्णय दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button