छत्रपतींच्या नावाने विडीसारखे उत्पादन चालविणे अनुचित; मुख्यमंत्र्यांनी कंपनीचे नाव बदलण्यास निर्देश द्यावेत- अमोल कोल्हे

Uddhav Thackeray & Amol Kolhe

मुंबई : नारायणगाव येथील साबळे आणि वाघिरे  कंपनीने छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने विडी विक्रीस आणली आहे. छत्रपतींच्या नावाने विडीसारखे उत्पादन चालविणे सर्वथा अनुचित आहे. यामुळे शंभूप्रेमी जनतेमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली असून कंपनीला विडीचे नाव बदलण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

यासंबंधी खासदार अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) पत्र लिहिले आहे. या पत्रात कोल्हे म्हणाले आहेत की, छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजीराजे समस्त मराठी जनतेचे स्फूर्तिस्थान आहेत. त्यांच्या नावाने विडीसारखे उत्पादन चालविणे सर्वथा अनुचित आहे. संबंधित कंपनींना याबाबतची कल्पना शंभूप्रेमी मंडळींनी वेळोवेळी दिली व याबाबत नाराजीदेखील व्यक्त केली.

तसेच, सदर विडीचे नाव बदलण्याची विनंती करण्यात आली; मात्र, कंपनीने याकडे नेहमीच दुर्लक्ष केल्याचे खासदार कोल्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या लक्षात आणून दिले आहे. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे नाव विडीसारख्या उत्पादनास असणे ही प्रत्येक राष्ट्राभिमानी नागरिकासाठी खेदाची व संतापजनक बाब आहे.

यामुळेच राज्य शासनाने कंपनीला विडीचे नाव बदलण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी खा . कोल्हे यांनी केली आहे .दरम्यान, विडी ओढणे हा एका व्यसनाचा प्रकार असून विडीला दिलेले छत्रपती संभाजी महाराजांचे नाव हटवा, या मागणीसाठी महाराष्ट्र शिवधर्म फाउंडेशन या संघटनेने आंदोलन पुकारले होते.या पार्श्वभूमीवर संबंधित विडी कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे यांनी काल सासवड पोलीस ठाण्यात साबळे व वाघिरे व्यवसाय समूहाच्या संचालक आणि संचालक मंडळाविरुद्ध तक्रारदेखील दाखल केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER