महिलांसाठी उद्यापासूनच लोकलमध्ये प्रवासाची सोय करणे अशक्य

- राज्याच्या पत्राला रेल्वेचे उत्तर

Local Railway

मुंबई : प्रवाशांच्या संख्येचे मूल्यांकन करुन, त्यानूसार नियोजन करने आवश्यक आहे. त्यामुळे उद्यापासून महिलांना लगेचच लोकलमधून प्रवासाची परवानगी सोय करणे शक्य नाही, असे रेल्वेने राज्य सरकारला कळवले आहे. महिलांना ठराविक वेळेत लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी द्या, असे विनंतीपत्र राज्य सरकारने रेल्वे बोर्डला पाठवले होते. त्यामुळे उद्यापासून महिलांना निर्धारित वेळेत लोकलमध्ये प्रवास करण्याची परवनगी द्या, अशी विनंती राज्य सरकारने रेल्वेला केली होती.

राज्य सरकारने रेल्वेला म्हटले होते की, नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून (१७ ऑक्टोबर) महिलांना दोन टप्प्यांत लोकलने प्रवास करण्यास मुभा द्या. सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत आणि संध्याकाळी ७ नंतर अशा दोन टप्प्यांत महिलांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्याची विनंती करण्यात आली होती. यानंतर उद्यापासून महिलांना लोकलमध्ये प्रवास करण्याची परवानगी मिळाली आहे, अशा बातम्या झळकल्या होत्या.

प्रवाशांच्या संख्येचे मूल्यांकन करुन, त्यानूसार नियोजन करने आवश्यक आहे. त्यामुळे उद्यापासून महिलांना लगेच परवानगी देणे शक्य नाही, असे रेल्वेकडून राज्य सरकारला कळवण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER