फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांची मुलाखत बघितली हे महत्त्वाचे; संजय राऊतांचा टोला

Sanjay Raut & Devendra Fadnavis

मुंबई :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने एक वर्ष पूर्ण केल्याच्या निमित्ताने सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेऊन प्रसारित केली. या मुलाखतीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपाला लक्ष्य केले होते. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंवर प्रश्नांची सरबत्ती केली.

त्यांच्या या प्रश्नाला संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर देत फडणवीसांनी मुलाखत बघितली हे महत्त्वाचे म्हणत टोला लगावला. फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे उत्तम जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांची मुलाखत बघितली ते अतिशय महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होईल अशी कुठलीही घटना या राज्यात घडलेली नाही. जर त्यांना कंगनासारख्या प्रकरणात राष्ट्रपती राजवट लावायची असेल तर आधी संसदेत कायदा करावा, असा खोचक सल्लाही त्यांनी दिला.

ही बातमी पण वाचा : संजय राऊतांचा ईडी, सीबीआयवर निशाणा ; व्यंगचित्र ट्वीट करत अप्रत्यक्ष भाजपवर टीकास्त्र 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER