
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या ‘मलाही मुख्यमंत्री व्हावं वाटतंय’ या इच्छेवर पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज कोल्हापुरात मिस्कील प्रतिक्रिया दिली. जल संपदामंत्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यावर पवार म्हणाले, मग त्यात काय झालं? इच्छा व्यक्त करण्याचा सर्वांना अधिकार आहे. त्यांना शुभेच्छा, उद्या मलाही वाटेल मुख्यमंत्री व्हावं, कोणी करणार का? असे सांगत एक सूचक इशाराही पवार यांनी दिला.
मुख्यमंत्री व्हावेसे वाटते, अशी सुप्त भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली होती. तसेच दीर्घकाळ राजकारणात काम करणाऱ्या कुणालाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटू शकते, मलाही तसे वाटणे स्वाभाविक आहे; पण शरद पवारांचा निर्णय हा आमच्या दृष्टीने अंतिम आहे.
राजकीय वर्तुळातील चर्चेनंतर मी असे म्हटलेच नसल्याचे सांगत जयंत पाटील यांनी यूटर्नही घेतला. मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? असा प्रश्न मला विचारण्यात आला होता. त्यावर मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करत संबंधित वाहिनेने वृत्त दाखवले, असे स्पष्टीकरण जयंत पाटील यांच्याकडून देण्यात आले. आमच्याकडे संख्याबळही कमी आहे; शिवाय राष्ट्रवादीत कोणताही निर्णय केवळ शरद पवार हेच घेत असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
अजित पवारांचा (Ajit Pawar) जयंत पाटील मुख्यमंत्री व्हावे, यासाठी पाठिंबा असेल तर आमचा पाठिंबा नसण्याचे कारण नाही. आपल्या पक्षाचा, आपल्या विचारांचा मुख्यमंत्री व्हावा, अशी इच्छा असण्यात गैर काय? अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही यावेळी दिली.
ही बातमी पण वाचा : जयंत पाटलांची मुख्यमंत्री बनण्याची इच्छा, त्यांच्या इच्छेला माझ्या शुभेच्छा’ – अजित पवार
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला