भारतीयांच्या ‘या’ योगदानामुळंच जगभरात विज्ञानाचा विकास झाल्याचं मानलं जातं!

Rochak Mahiti-Maharashtra Today

वैज्ञानिक (Science) विकासाच्या दृष्टीकोनातून भारतीयांबद्दल विचार करताना नेहमी विज्ञान विषयक अस्था नसलेले लोक अशी व्याखा केली जाते. धर्माचा जास्त पगडा असल्यामुळं भारतात विज्ञान रुजलं नाही अशा वल्गना केल्या जातात. युरोपाची आजची प्रगती बघता भारत आज वैज्ञानिक स्पर्धेत त्यांच्याहून मागास वाटत असला तरी ते इतिहास मात्र याबद्दल काही वेगळीच साक्ष देतो. आजच्या विज्ञानाचा पाया ज्या गोष्टींवर रचला गेला, विज्ञानाच्या विकासासाठी सर्वात महत्त्वाच्या ज्या गोष्टींना मानलं जातं त्या सर्व वैज्ञानिक संकल्पनांचा विकास भारतात झालेला आहे. अनेकांना ही गोष्ट पटणार नाही पण हे वास्तव आहे. अधुनिक विज्ञानाचा जन्म युरोपीय प्रबोधन काळानंतरचा मानलो जातो म्हणजे १५ व्या शतकानंतरचा परंतू याच्या शेकडो वर्षांपासून भारतात युरोपात ज्या संकल्पनांची मांडणी मात्र होत होती त्याचे प्रयोग भारतात सुरु झाले होते.

गणिताचा विकास

गणिताला विज्ञान जगात सर्वाधिक महत्त्व प्राप्त आहे. गणिता शिवाय मोठमोठे वैज्ञानिक सिद्धांत फक्त कागदावरचे आकडे आणि अक्षर ठरतात. कोणताही वैज्ञानिक सिद्धांत मांडण्यापुर्वी त्याची गणितीय मांडणी आवश्यक असते. भारता इतके प्रग्लभ गणित तज्ञ आजही जगभरात आढळत नाहीत याची सुरुवात केली होती भास्कराचार्यांनी (Bhaskaracharya).

भारताच्या इतिहासात इ.स १११४ – ११८५ या काळात भारतात भास्कराचार्य नावाचे महान गणितज्ञ आणी ज्योतिषी होऊन गेले. ज्यांनी न्यूटनच्या जन्माच्या अनेक शतकां आधीच पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लावला होता. आपल्या ग्रथांत त्यांनी लिहलंय की ‘पृथ्वी अवकाशीय पदार्थांना विशिष्ट शक्तीने आपल्याकडे खेचते.’

लीलावती, बीजगणित, ग्रहगणित, गोलाध्याय अशा अनेक ग्रथांची त्यांनी रचना केली. आजही जगभरात त्यांच्या ग्रथांचा अभ्यास केला जातो

वैद्यकीय सुविधा

भारतात गेल्या शतकात प्लेकनं थैमान घातलं होतं. गेल्या वर्षापासून कोरोनाच्या सावटाखाली देश आहे. या रोगांवर मात करण्यासाठी आवश्यक लसी उपलब्ध झाल्यात. परंतू भारतीय लोकांनी लस विषयक संभ्रम असल्यामुळं सुरुवातीला लसीकरणाला प्रतिसाद दिला नव्हता. यावेळी अनेकांनी वैद्यकीय विषयातल्या भारतीय ज्ञानाबद्दल अनेक विधानं केलं होती. काहींची विधानं खरी असली तरी अनेकांनी भारतीयांना वैज्ञानिक विषयातलं ज्ञान नाही अशी मांडणी केली होती.

कदाचित त्यांना हे माहिती नसावं की जगभरात माणसं मरायची तेव्हा त्यावर औषध घेऊन रुग्ण बरा केला जाऊ शकतो तेव्हापासून भारतात औषधच नाही तर शस्त्रक्रिया होत आल्यात. याबद्दल बोलताना सुश्रूतांच उदाहणर दिलं जातं. इ.स. पूर्व ८०० च्या कालावधीत काशी येथे जन्मलेल्या सुश्रूत ऋषींना ‘शल्यचिकित्सा शास्त्राचे जनक’ मानले जातं. सुश्रूतांनी ३०० प्रकारच्या शस्त्रक्रियांचा शोध लावला होता. यात मोतीबिंदू सारख्या शस्त्रक्रियेचाही समावेश आहे!

त्या काळात ते कॉस्मेटिक सर्जरीसारख्या शस्त्रक्रियेचा उपचार सहज करत. शस्त्रक्रियेसाठी ते वेगवेगळी १२५ प्रकारची साधने वापरत असत. त्यांच्या ‘सुश्रूत संहिता’ या ग्रंथात वैद्यकीय शास्त्राची अचंबित करणारी माहिती दिली गेलीय.

शुन्यातून विश्वनिर्मिती

मोठ मोठ्या वैज्ञानिक आकडे मोडी, संगणक, मोबाईल, उपग्रह यांच्या शोधाचं मुळ शुन्यात सापडतं. भारताकडून जगाला मिळालेली अनोखी भेट म्हणजे ‘शून्याचा शोध’ असं उगाच मानलं जात नाही. सन ४९८ च्या कालावधीत भारतातील ‘आर्यभट्ट’ नावाच्या महान गणितज्ञ आणि ज्योतिष्याने दशांश पद्धती आणी शून्याची कल्पना लोकांसमोर आणली.

यापुर्वी लोकांना एका ठराविक मर्यादेपर्यंतच संख्या लिहिता येत होत्या. त्यांनी लिहिलेल्या ‘आर्यभट्टीय’ या ग्रंथात शून्याच्या वापरासंबंधी सविस्तर माहिती मांडली आहे. संख्येसमोर शून्य लावल्याने त्या संख्येची किंमत दसपटीने वाढवता येऊ लागली. शून्याचा अविष्कार झाल्यानंतर गणितीय संकल्पनाचे स्वरुपच बदलून गेले. अधुनिक विज्ञानाच्या जडणघडणीत शुन्याचा आणि पर्यायाने भारताचा मोठा वाटा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button