शेतकरी पूजा करतात ते जाळणे हा शेतकऱ्यांचा अपमान; ट्रॅक्टर जाळल्याबद्दल मोदींचा संताप

PM Modi On Burning Tactor

दिल्ली :- कृषी विधेयकांचा विरोध करताना काँग्रेसने ट्रॅक्टर जाळल्याबद्दल संताप व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणालेत, शेतकरी ज्याची पूजा करतात ती उपकरणे जाळणे हा शेतकऱ्यांचा अपमान आहे. शेतीविषयक कायद्याचा विरोध करताना दिल्लीत इंडिया गेटवर पंजाब युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टर जाळला होता.

उत्तराखंड येथील विकास प्रकल्पाचे उद्घाटन करताना या घटनेचा उल्लेख करताना काँग्रेसवर टीका करताना ते म्हणाले की – शेतकरी आता कुठेही आणि कोणालाही धान्य विकू शकतो. केंद्र सरकार शेतकऱ्याला त्यांचे हक्क देते आहे.  त्याला हे लोक  विरोध करत आहेत. शेतकऱ्याने त्याचे धान्य खुल्या बाजारात विकू नये अशी त्यांची इच्छा आहे. त्यांना नफा कमावण्यासाठी मध्यस्थ हवा आहे. ते शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याला विरोध करत आहेत.

ही बातमी पण वाचा : … तर शेतकरी आत्महत्या दुप्पट होतील; शिवसेना आमदाराच्या मुलीचे पंतप्रधान मोदींना पत्र

हे लोक एमएसपीवरून शेतकऱ्याची दिशाभूल करत आहेत. या कायद्यांमुळे देशात शेतकऱ्यांना फक्त एमएसपी मिळेल असे नाही तर आपले धान्य कुठेही विकण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे. काही लोकांना हे स्वातंत्र्य पाहावत नाही.

त्यांचा काळा पैसा कमावण्याचा एक मार्ग बंद झाला आहे, अशी टीका नरेंद्र मोदींनी केली. चार वर्षांपूर्वी आपल्या शूर जवानांनी सर्जिकल स्ट्राइक करून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. विरोधक त्याचे पुरावे मागत होते. सर्जिकल स्ट्राइकला विरोध करून त्यांनी आपली वृत्ती देशाला दाखवून दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER