भीमा कोरेगाव प्रकरणी विशेष चौकशी पथकाची स्थापना करणार ; शरद पवारांच्या बैठकीत निर्णय : नितीन राऊत

Sharad Pawar - Nitin Raut

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत काल झालेल्या बैठकीत भीमा कोरेगाव दंगलीचं षडयंत्र रचणा-या खऱ्या गुन्हेगारांची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी पथकाची स्थापना करण्याबाबत गंभीर चर्चा. आधीच्या भाजपा सरकारने मोकाट सोडलेल्यांची आता गय करायची नाही हा निर्धार असल्याचे ट्विट ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांनी केले आहे .

भीमा कोरेगाव प्रकरणी SIT चौकशी होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीत आज काँग्रेसने या प्रकरणी SIT चौकशीची मागणी केली. शरद पवार यांनी आधीच भीमा कोरेगाव प्रकरणातSIT चौकशीची आग्रही भूमिका घेतली होती. दरम्यान, एका आठवड्याच्या आत याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नितीन राऊत चर्चा करतील आणि पुढची भूमिका ठरवतील, असे यावेळी ठरल्याचे समजते आहे.

भीमा कोरेगावबाबत गेले अनेक आम्ही अस्वस्थ आहोत, नक्षलवादाच्या नावाखाली अटक केली जाते, हे योग्य नाही. आम्ही आज या प्रकरणाचा आढावा घेतला आहे. याची चौकशी NIA करते आहे, पण राज्य सरकारलाही काही अधिकार आहेत. त्या अनुषंगाने काय करता येईल याबाबत तज्ज्ञांचे मत घेत आहोत. आम्हाला वाटतं हा तपास योग्य दिशेने सुरू नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी यावेळी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER