आपली माणस महाराष्ट्राला बदनाम करतात तेव्हा दु:ख होतं, मुख्यमंत्री ठाकरेंचा फडणवीसांना टोला

Devendra Fadnavis - CM Uddhav Thackeray

मुंबई : राज्यातील लॉकडाऊन टप्प्याटप्प्यानं हटवण्यात येणार असून आता लॉकडाऊन हा शब्दच केराच्या टोपलीत टाकायचा आहे असा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. आता मिशन बिगिन अगेन सुरू होत असल्याची घोषणा ठाकरेंनी केली. महाराष्ट्रातील परिस्थिती हातबाहेर गेलीय असा आरोप केला जातो पण वास्तव असं नाहीय असा दावा ठाकरे यांनी केला. तसेच महाराष्ट्रातील करोना रुग्णांची नेमकी स्थिती त्यांनी आकडेवारीनिशी सांगितली. ‘आपली माणस महाराष्ट्राला बदनाम करण्याच कारस्थान करतात तेव्हा दु:ख होतं’ अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

“सध्याच्या घडीला राज्यात कोरोनाच्या ६५ हजार केसेस आहेत. मात्र यातले २८ हजारच्या आसपास रुग्ण बरे होऊन घरीदेखील गेले आहेत. मात्र तरीही त्यांना ६५ हजारमध्ये धरलं जातं हे चूक आहे” असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

“आजपर्यंत महाराष्ट्रात २८ हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या ३४ हजार अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. त्यात २४ हजार रुग्णांमध्ये कुठलीही लक्षणे नाही. मध्यम ते तीव्र लक्षणाचे ९,५०० रुग्ण आहेत. १२०० रुग्णांची स्थिती गंभीर आहे. त्यात २०० रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत” असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. महाराष्ट्राला बदनाम करण्याच कारस्थान आपली माणस करतात तेव्हा दु:ख होतं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER