‘पाकीजा’ चित्रपट बनवायला लागली १६ वर्षे; मीनाकुमारीच्या या गाण्यासाठी फवाऱ्यांत वापरले होते असली गुलाबजल

Pakija

‘कौन बनेगा करोडपती’मध्ये अमिताभ बच्चन यांनी चित्रपट आणि वैयक्तिक जीवनाशी संबंधित अनेक रहस्ये उघडकीस आणली आहेत. ते इंडस्ट्रीतील कलाकारांविषयी रोचक तथ्य सांगत असतात. मंगळवारी प्रसारित झालेल्या मालिकेत अमिताभ बच्चन यांनी कमल अमरोही यांच्या ‘पाकीजा’ (Pakeezah) चित्रपटाच्या तथ्यांचा उल्लेख केला होता, ज्याची माहिती फारच कमी लोकांना असेल.

रोलओव्हर स्पर्धक अफसीन नाज हॉट सीटवर बसली होती. प्रश्न म्हणून अमिताभ यांनी अफसीनला ‘पाकीजा’ शब्दाचा अर्थ विचारला. हा प्रश्न येताच अमिताभ बच्चन यांनी पाकीजा चित्रपटाशी संबंधित तथ्ये सांगायला सुरुवात केली. त्यांना मीनाकुमारीवर शूट केलेला नृत्यक्रम (Dance Sequence) आठवला.

अमिताभ बच्चन म्हणतात की, ताजमहालसमोर जसे फवारे (Fountain) ठेवलेले आहेत तसेच फवारे चित्रपटाच्या सेटवर बनवले गेले होते. कमल अमरोही यांची या चित्रपटाचे प्रत्येक दृश्य परिपूर्ण व्हावे अशी इच्छा होती. त्यांनी फवाऱ्यांसाठी गुलाबजल वापरले. सांगण्यात येते की, मीनाकुमारीचे डान्स सीक्वेन्स फवाऱ्यांसमोर शूट केले गेले आहे.

पाकीजाला हिंदी चित्रपटाच्या इतिहासाचा कल्ट क्लासिक मानला जातो. हा चित्रपट १९७२ मध्ये प्रदर्शित झाला आणि सुमारे १६ वर्षे लागली. मीनाकुमारीने पाकीजासाठी फक्त टोकन रक्कम घेतली, जी एक रुपया होती. हा चित्रपट मीनाकुमारीचा शेवटचा चित्रपट होता. जास्त मद्यपान करत असल्यामुळे मीनाला यकृत सिरोसिसचा (Liver Cirrhosis) आजार होता. चित्रपटाच्या रिलीजच्या काही आठवड्यांनंतर मीनाकुमारीने जगाला निरोप दिला.

स्पर्धक अफसीन नाजविषयी बोलायचं तर ती छत्तीसगडमधील बिलासपूरची रहिवासी आहे. ती व्यवसायाने शिक्षक आहे. शोमध्ये अफसीनने सांगितले की, लवकरच ती विवाह करणार आहे. तिचा भावी पतीही शिक्षक आहे. अफसीन सांगते की, ती येथून जास्तीत जास्त पैसे जिंकण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून ती आपले घर बनवेल आणि स्वप्न पूर्ण करेल. २५ लाख रुपये जिंकून ती घरी परतली. अफसीनच्या चारही लाईफ लाईन संपल्या. ५० लाखांच्या प्रश्नावर अफसीनने खेळ सोडला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER