‘देण्यापेक्षा मागणं हाच या ठाकरे सरकारचा बाणा झालाय’, भाजपचा मुख्यमंत्र्यांना टोला

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी शुक्रवारी तौत्के चक्रीवादळामुळे हानी झालेल्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी माध्यमांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला भरघोस मदत केली आहे. मोदी संवेदनशील आहेत. त्यामुळे ते महाराष्ट्रालाही मदत करतील, असे मुख्यमंत्री उद्वव ठाकरे म्हणाले होते. त्यांच्या या विधानावर आता भाजपने(BJP) टोला लगावला.

वादळग्रस्तांना राज्य सरकारकडून मदत जाहीर करण्याआधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राकडे झोळी पसरायची तयारी केली आहे. पंचनाम्यांचा हिशेबही पूर्ण झाला नसताना ते केंद्राच्या तिजोरीत डोकावू लागलेत. देण्यापेक्षा मागणं हाच या ठाकरे सरकारचा बाणा झालाय, असे म्हणत भाजपचे आमदार अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar) यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button