मनरेगाच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा काँग्रेसच्या उमेदवारासाठी ठरतो डोकेदुखी

issue of MNREGA corruption is a headache for the Congress candidate

नांदेड/प्रतिनिधी: मुखेड – कंधार विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवाराला त्यांनी केलेल्या मागील काळातील विविध योजनेतील भ्रष्टाचार डोकेदुखी ठरत असून, त्यांच्या सकारात्मक प्रचारा पेक्षाही जास्त त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चर्चा मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियाच्या माध्यमातून ऐकावयास व पहावयास मिळत आहे.

मुखेड – कंधार मतदारसंघात प्रचाराला वेग आला आहे. विविध पक्षाकडून निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांना वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला प्रचाराला वेग दिला असल्याचे पाहावयास मिळत आहे. यामध्ये गावांमध्ये जाऊन लहान-सहान सभा घेणे, ध्वनिक्षेपण यंत्रच्या माध्यमातून प्रत्येक गावात आपला प्रचार करणे. तसेच विविध पक्षाकडून मोठ्या प्रमाणावर एलईडी व्हॅन प्रचारात उतरविल्या गेल्या आहेत. यांच्या माध्यमातून मागील काळात केलेल्या विकासाचा व आगामी काळातील करण्यात येणार्‍या विकास कामाचा लेखाजोखा दाखविण्यात येत आहे. या प्रचाराच्या यंत्रणेत सोशल मीडिया वरून ही मोठ्या प्रमाणावर प्रचार केला जात असल्याचे दिसून येत आहे. प्रमुख पक्षाच्या उमेदवारापेक्षाही जास्त त्यांचे समर्थक आक्रमक असल्याचे पाहावयास मिळतात एकमेकाच्या उमेदवारावर अतिशय जोरदार टीका केल्या जात आहे. यामध्ये काँग्रेसच्या उमेदवारावर मोठ्या प्रमाणात त्यांनी मागील काळात केलेल्या भ्रष्टाचाराची जोरदार चर्चा सोशल मीडियाच्या माध्यमातून पहावयास मिळत आहे. गोरगरिबांच्या हाताला काम लागावे या हेतूने राज्य शासनाने मनरेगा योजना अमलात आणली. मात्र या योजनेतून गोरगरीब गोरगरिबच राहिले काही व्हाईट कोलर नेते काही दिवसातच करोडपती झाले. तालुक्यात झालेल्या या भ्रष्टाचारात मृत व्यक्तीच्या नावानेही या पुढार्‍यांनी पैसे उचलून खाल्ल्याची अनेक प्रकरणे त्यावेळी उघडकीस आले. तर सीमेवर देशाचे संरक्षण करणार्या सैनिकांच्या नावानेही जॉब कार्ड बनवून या पुढार्‍याने भ्रष्टाचार करून भ्रष्टाचारांच्या सर्व सीमा सोडल्या होत्या. याबाबतची चर्चा सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर होत असल्याने आता प्रचाराच्या शेवटच्या काळात हा मुद्दा कमालीचा उचलला जात आहे. यामध्ये विशेष बाब म्हणजे सदर मनरेगा घोटाळा झाला तेव्हा ज्या पक्षाकडून त्यांनी उमेदवारी घेतली या पक्षाची व तत्कालीन लोकप्रतिनिधीची मोठ्या प्रमाणावर त्यावेळेस बदनामी झाली होती.

मात्र या मनरेगाच्या या घोटाळ्यात ना पक्षाच्या हाती काही लागले ना तत्कालीन लोकप्रतिनिधीच्या हाती काही लागले. सर्वच्या सर्व मलिदा विद्यमान काँग्रेसच्या उमेदवारांच्या हाती लागल्याची चर्चा सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार होत आहे. तुमचे मत विकासाला की भ्रष्टाचाराला हाच मुद्दा सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मुखेड – कंधार मतदारसंघात पहावयास मिळत आहे.