राज्यांतर्गत टूर्स सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी

Covid 19 Protocols For Maharashtra Tourism

मुंबई : राज्य सरकारने मिशन बिगेन अंतर्गत अनलॉक-५ च्या (Unlock-5) नियमात अनेक शिथिलता दिली आहे. सोमवारपासून राज्यभरातील बार आणि रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास पर्यटन विभागाने परवानगी दिली. त्यानंतर आता राज्यांतर्गत टूर्स सुरू करण्यासाठी पर्यटन विभागाने टूर्स ऑपरेटर्ससाठी नियमावली जारी केली आहे. ज्या पर्यटन ठिकाणी स्थानिक प्रशासनाकडून संमती देण्यात आलेली आहे किंवा मनाई करण्यात आलेली नाही, अशा ठिकाणी कोरोना रोखण्यासाठीचे सर्व नियम पाळून टूर ऑपरेटर यांच्यासाठी ही मार्गदर्शक तत्त्वे पाळावी लागणार आहे.

प्रशासनाने पर्यटनासाठी मनाई केलेल्या तथा प्रतिबंधित केलेल्या स्थळांना वगळून इतर ठिकाणी टूर ऑपरेटर्सनी घ्यावयाच्या दक्षतांबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. पर्यटकांना टूर्स सुरू करण्याच्या १४ दिवसांपूर्वी माहिती देणे बंधनकारक असणार आहे. प्रवासाला निघण्यापूर्वी सर्व पर्यटकांची थर्मल स्क्रीनिंग करणे बंधनकारक असणार आहे. ज्या ठिकाणी जमावबंदीचे आदेश लागू असतील त्या ठिकाणी पाचपेक्षा जास्त लोकांची गर्दी होणार नाही याची दक्षता संबंधित टूर ऑपरेटरला घ्यावी लागणार आहे. त्याचप्रमाणे टूर दरम्यान सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, १० पर्यटकांसोबत एक गाईड, वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करणे, परवानगी असलेल्या मार्गानेच पर्यटनस्थळांची भ्रमंती करणे इत्यादी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER