अखेर ‘चांद्रयान २ ‘ अवकाशात झेपावले

chandrayaan-2-launch-successfully-sriharikota

नवी दिल्ली : भारताची ‘चांद्रयान मोहीम२’ काही वेळातच राबवण्यात आली असून दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी हे प्रक्षेपण करण्यात आले. श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रावरुन चांद्रयान २ चे प्रक्षेपण करण्यात आले. हे यान चंद्रावर पोहचण्यासाठी चाळीस दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागणार आहे. या मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते .
काही तांत्रिक अडचणींमुळे १५ जुलैला होणारे ‘चांद्रयान २’ चे प्रक्षेपण रद्द झाले होते. मात्र आता सर्व दूर झाल्यामुळे ‘चांद्रयान २’ उड्डाणासाठी सज्ज झाले होते .

दरम्यान इस्रोचे माजी अध्यक्ष ए. एस. किरणकुमार म्हणाले, की चांद्रयान-२ आता २२ जुलैच्या उड्डाणासाठी सज्ज असून सर्व तांत्रिक बिघाड दूर करण्यात आले आहेत. हे यान ६ सप्टेंबरला चंद्रावर उतरेल . चंद्राच्या पृष्ठभागावर यान उतरवून चंद्राच्या आजवर अभ्यास न झालेल्या दक्षिण ध्रुवाजवळील भागाचा अभ्यास करणाचे उद्दिष्ट आहे. चंद्रापासून ३० किलोमीटरवर गेल्यानंतर ‘चांद्रयान-२’ची गती कमी करण्यात येईल. विक्रमला चंद्राच्या भूमीवर उतरवणे अतिशय आव्हानात्मक असणार आहे. हीच शेवटची १५ मिनिटे महत्त्वाची ठरणार आहेत. भारत पहिल्यादाच सॉफ्ट लँडिंग करणार आहे.