गूडन्यूज! विक्रम लँडर पूर्णपणे सुरक्षित

isro-reveals-chandrayaan 2-vikram

बेंगळुरू :- चंद्रयान 2 मोहिम यशस्वी होत असताना, अवघ्या 2 किमीचं अंतर दूर करून विक्रम लॅंडर चंद्रावर पाय ठेवणार त्यातच लँडर चांद्रभूमीपासून अवघ्या २.१ कि.मी.वर असताना त्याचा ‘इस्रो’चे मुख्यालय आणि पृथ्वीवरील भूकेंद्रांशी असलेला संपर्क तुटला होता. परंतू आत्ता आलेल्या वृत्तानुसार विक्रम लँडर पूर्णपणे सुरक्षित असल्याचं सांगितलं आहे. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी याबाबतची माहिती पीटीआयला दिली आहे. तर यापुर्वी रविवारीच लँडर विक्रम सापडलं असल्याचं स्पष्ट केलं होतं.

ही बातमी पण वाचा : इस्त्रो पुन्हा घेणार चंद्रभरारी…

ऑर्बिटरनं पाठवलेल्या फोटोवरून लँडर पुर्णपणे सुरक्षित असल्याचं समोर आलं आहे. लँडरचे तुकडे होण्याची भिती व्यक्त केली जात होती. मात्र तसे काही झालेलं नसल्याचं इस्त्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. विक्रमशी संपर्क साधण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचंही त्यांनी म्हटलं.

इस्रोचे वैज्ञानिक पुढचे १४ दिवस लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहेत. लँडरला शोधून त्याच्याशी संपर्क साधणे हे त्यावेळी नेमकं काय घडलं? हे शोधून काढण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल आहे. लँडरशी पुन्हा संपर्क साधण्यासाठी पुढचे दोन आठवडेच हातात आहेत कारण त्यानंतर चंद्रावर रात्र सुरु होईल. चंद्रावरचा एक अख्खा दिवस पृथ्वीवरच्या चौदा दिवसांबरोबर आहे. चंद्रावर रात्रीच्यावेळी कडाक्याचा थंडावा असतो त्यावेळी लँडरमधील उपकरण निकामी झालेली असू शकतात. कारण लँडर आणि रोव्हरची डिझाईन १४ दिवस काम करण्याच्या दृष्टीनेच करण्यात आली होती.