बॉम्बस्फोट तपासात इस्राईलची गुप्तचर संस्था मोसाद सामील

नवी दिल्ली : दिल्लीतील इस्राईल दूतावासासमोर (Israeli intelligence agency) काही दिवसांपूर्वी झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाच्या तपासात इस्राईलची गुप्तचर संस्था मोसाद सामील झाली आहे. मोसादच्या पथकाने नुकताच यासंदर्भात राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याकडून या प्रकरणाची माहिती घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

29 जानेवारी रोजी झालेल्या बॉम्बस्फोटामागे (Bomb blast) इराणचे लोक सामील असण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने एनआयए आणि मोसाद तपास करीत आहे. एनआयएने दिल्लीतील काही इराणी संशयितांची चौकशीही केली होती. मोसादचे पथक तपासात सामील होण्यासाठी तेल अविव येथून आले आहे. सोशल मीडियाच्या आधारे दोन्ही तपास संस्था तांत्रिक माहितीही जमवित आहेत.

झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाच्या तपासात इस्रायल भारताला पूर्णपणे सहकार्य करेल, असे इस्राईलचे भारतातील राजदूत रॉन मालका यांनी सांगितले होते. ए. पी. अब्दुल कलाम मार्गावर इस्रायल दूतावास आणि त्याला लागून जिंदाल हाऊस आहे. या दोन्हीचा मध्ये कमी क्षमतेचा बॉम्बस्फोट झाला होता. बॉम्बस्फोटात जीवितहानी झाली नव्हती, मात्र अनेक गाड्यांचा काचा फुटल्या होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER