कासीम सुलेमानीला उडवण्यात इस्रायलने केली अमेरिकेची मदत

Israeli help US for kasim-sulemani-murder

वॉशिग्टन : अमेरिकेने इराणचे कमांडर जनरल कासिम सुलेमानी याना अतिशय नाट्यमय पद्धतीने बगदादच्या विमानतळावर उडवल. आता मिळालेल्या माहितीनुसार या कटात इस्रायलने अमेरिकेची मदत केली आहे.

कासिम सुलेमानी यांना ठार करण्याच्या कटाची माहिती अमेरिकेशिवाय फक्त इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना होती कारण, कासिम सुलेमानी यांच्या प्रवासाच्या माहितीची खातरजमा इस्रायलच्या ‘मोसाद’ या गुप्तचर संस्थेनेच केली होती.

दमिश्क येथील अमेरिकेच्या खबऱ्यांनी सीआयएला कासीम सुलेमानीच्या प्रवासाची माहिती दिल्यानंतर अमेरिकेने ती माहिती मोसाद्ला दिली आणि मोसादने तिची खातरजमा केल्यानंतर कासीम सुलेमानीला उडवण्याचा कट रचण्यात आला. ही माहिती बगदाद विमानतळावरील दोन व चाम एयरलाइंसच्या दोन कर्मचाऱ्यांनी दिली होती. कासीम सुलेमानी चाम एयरलाइंसच्या विमानानेच बगदादला आले होते.

या कटाच्या तयारीबाबतच्या माहितीची देवाण – घेवाण करण्यासाठी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ हे एकमेकांच्या संपर्कात होते.