हिंदुस्थानवरील कोरोनाचे संकट टाळण्यासाठी इस्रायली नागरिकांचे शंकराला साकडे; सुरू आहे ‘ॐ नम: शिवाय’चा जप

Om Nam Shivaya To Avodi Corona crisis - Maharashtra Today

हिंदुस्थानमध्ये सुरू असलेली कोरोनाची साथ संपुष्टात येऊ दे, असे साकडे इस्रायलच्या नागरिकांनी शंकराला घातले आहे. हे नागरिक ‘ॐ नमः शिवाय’चा जप करत आहेत!

इस्रायलच्या नागरिकांचा हा व्हिडीओ इस्रायलमधील हिंदुस्तानचे राजकीय दूत पवन के. पाल यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवर शेअर केला आहे. ‘आपल्यासाठी संपूर्ण इस्रायल एकत्र येऊन आशेचा किरण बनत आहे.’ असे त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे. इस्रायल आणि हिंदुस्थानमध्ये चांगली मैत्री आहे.

आध्यात्मिकतेचा संदेश घेण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी इस्रायली नागरिक मोठ्या संख्येत हिंदुस्थानला दरवर्षी भेट देत असतात. काही जण सांगतात की, इस्रायलमध्ये तीन वर्षे लष्कराचे अत्यंत कठीण ट्रेनिंग घेतल्यानंतर बरेच जण मन:शांतीसाठी येथे येतात. हिमाचलप्रदेश, लडाखमधील पर्वतरांगांमध्ये साधना करतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pawan K Pal 🇮🇳 (@pawank90)

Disclaimer :-बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button