
मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patel) आयसोलेशनमध्ये ( Isolation) असतानाही जुहू येथील सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झालेत! यावरून भाजपाचे नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी – नानाच्या नाना तऱ्हा!! सकाळी आयसोलेशन अन् रात्री सेलिब्रेशन! हाच आहे काँग्रेसचा तमाशा, असे म्हणत टीका केली.
नाना पटोले यांनी त्यांच्या कुटुंबातील एकाला कोरोनाची लागण झाल्याने काही दिवस आयसोलेशनमध्ये राहणार असल्याचे सांगितले होते. मात्र, त्यानंतर काल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त जुहू येथील आयोजित कार्यक्रमात भाग घेतला! नाना पटोले यांनी स्वत: ट्विट करून त्यांचा या कार्यक्रमातला फोटो शेअर केला. यावरून भाजपाचे नेते प्रसाद लाड यांनी नाना पटोले यांच्यावर टीका करणारे ट्विट केले.
ट्विटमध्ये म्हटले आहे – नानाच्या नाना तऱ्हा!! ‘सकाळी आयसोलेशन अन् रात्री सेलिब्रेशन! हाच आहे काँग्रेसचा तमाशा. स्वतःचे कार्यक्रम जोशात साजरे करायचे आणि असेच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरे करणाऱ्यांना १४४ कलम लावून अटक करायचं, अशी टीका करतानाच नानाजी मांजरा सारखं वागताय, डोळे मिटून सगळे नियम मोडताय!
नाना च्या नाना तऱ्हा!!
‘सकाळी आयसोलेशन अन् रात्री सेलिब्रेशन!
हाच आहे काँग्रेस चा तमाशा…
स्वतःचे कार्यक्रम जोशात साजरे करायचे आणि असेच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरे करणाऱ्यांना १४४ कलम लाऊन अटक करायचं!
नानाजी मांजरा सारखं वागताय डोळे मिटून सगळे नियम मोडताय! pic.twitter.com/9No51yz9rZ— Prasad Lad (@PrasadLadInd) February 19, 2021
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला