अजूनही धरित्रीच्या अश्रूंची किंमतच नाही का ?

Isn't earth still worth tears?

हाय फ्रेंड्स ! कित्येक वर्षांपासून आपण ग्लोबल वॉर्मिंग ,पर्यावरण (Global warming, environment) असमतोल यासारख्या विषयांवर आपण चर्चा करत आलो आहोत. त्यासाठी निबंध स्पर्धा होतात ,पोस्टर स्पर्धा होतात पण जेव्हा सर्वत्र पाईपलाईन फुटल्यामुळे पाणी वाया जाणे ,रस्त्यारस्त्यांवर असणारे कचऱ्यांचे ढीग, होणारी जंगलतोड ,कागदांचा गैरवापर, प्लास्टिकचा महापूर ,नद्यांमधील गलिच्छ कचरा बघितले की वाटते या धरित्रीच्या दुखायला काही किंमतच नाही का ? धरित्री मातेच्या अश्रूंची किंमत आपण केव्हा करणार आहोत ? मूळ प्रश्न तर कायम बाजूलाच राहतोय.

खरेतर भारतीय चिंतन व तत्त्वज्ञान यांचे हे वैशिष्ट्य आहे की त्याने मनुष्य सृष्टी आणि परमेश्वर यांना एक प्रकारच्या समग्र दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न केला .या वेळेला जेव्हा आपल्या विचारांची व्याप्ती वाढते त्यावेळेला संपूर्ण विश्वच एक परिवार आहे ही भावना दृढ होते खरंतर “वसुधैव कुटुम्बकम “वैचारिक पार्श्वभूमी फक्त मानवाच्या सामाजिक संबंधांविषयी सहकार्य स्थापन करण्यापुरती आपली दृष्टी व्यापक करीत नाही तर संपूर्ण सृष्टी व पृथ्वी यांच्याशी सुद्धा एक वेगळाच ऋणानुबंध तयार करायला समर्थ होते . भारतीय चिंतनात फार पूर्वीपासून हा विचार कायम राहिला आहे की पृथ्वी आमच्यासाठी केवळ जमीन किंवा भूप्रदेश नाही तर एक जिवंत सजीव अशी आमची आई आहे, ती आमचे रक्षण, संगोपन आईच्या प्रमाणेच करते .प्राचीन वेदकालीन ऋषींनी सुद्धा हाच विचार केला आणि वैदिक काळापासून तर काही शतके पूर्व पर्यंत देखील हे चिंतन मनुष्याच्या मनावर प्रभाव टाकीत होतं. याचा प्रभाव होता तोपर्यंत मानवाने प्रकृतीशी आजूबाजूच्या सृष्टीशी संतुलन ठेवण्याचा कायम प्रयत्न केला.

त्यावेळी म्हणूनच ठरलेले ऋतू ठरलेल्या वेळेत येत असतं आणि संपत असतं .त्यानुसार येणारे अन्नधान्य आणि फळफळावलं देखील त्या त्या ऋतूत येत. आणि त्या ऋतूतील हवामानाला योग्य आणि पूरक असे हे अन्नधान्य आणि फळ भाजीपाला असत. आपोआपच सगळे सण समारंभ उत्सव सोहळे आणि त्यासाठी लागणारे नैवेद्य आणि त्या सण समारंभात दिले जाणारे काही खाद्यपदार्थांना महत्व हेसुद्धा फार विचारपूर्वक योजिले गेलेले होते.

धरित्री बरोबर येणारा आणखीन एक भाग म्हणजे येथे असणारे सूक्ष्म जीव सरपटणारे प्राणी, विविध प्राणिमात्र या सगळ्यांचा समावेश आपल्या संस्कृतीत असणाऱ्या या पद्धतीमधून केला गेला. उदाहरणार्थ नागपंचमी, खंडोबाची पूजा, पोळा, श्राध्द पक्षामध्ये कावळ्याला असलेले महत्व, पानाच्या बाजूच्या चित्रावलीतून बारीक मुंग्या किडे यांचा केलेला विचार,पारंपारिक गोग्रास काढून ठेवण्याची पद्धत या सगळ्यातूनच त्या-त्या प्राणिमात्रांना मिळालेली सद्भावना दिसून येते.

आवली भोजन, तुळशीचे महात्म्य, वडाची पूजा, पिंपळाचे महत्व या सगळ्यातूनच वृक्षांशी बांधिलकी होत असे .आपली जीवनशैली होती ती पूर्णपणे या निसर्ग चक्राशी बांधलेली होती. अक्षरश: दिवस रात्रीच्या चक्राशी सुद्धा आपले आयुष्य पूर्ण बांधलेले होते.

.मात्र गेल्या दोन तीन शतकांपासून औद्योगीकरण आणि सर्वत्र आपले पाय पसरवण्यास सुरुवात केली आणि तेव्हापासून मनुष्याच्या बुद्धीमध्ये स्वार्थाचा प्रभाव प्रखर झाला आणि पृथ्वी मातेचे अक्षरश: लचके तोडायला सुरुवात झाली. या विचारांना चालना देणार्‍या व त्यांना आश्रय देणाऱ्या तथाकतिथं नवा बुद्धी वादाने नवा विचार मोठ्यांना अहमहमिकेने मांडला की,” पृथ्वी म्हणजे एक निर्जीव भूमीचा तुकडा आहे म्हणून जर तिच्यामध्ये खोलवर मोठे स्फोट घडवून आणून नैसर्गिक साधने साध्य करून घेण्यात आले तर त्यात वावगे काही नाही. हा संपूर्ण खजिना माणसाच्या भल्यासाठी उपयोग करणे योग्य. मुळात स्वार्थी मनुष्याला या बुद्धिवादाचा आधार मिळताच त्याने त्याचा पुरस्कार केला आणि प्रयोगांती त्यांना वैज्ञानिक आकडेवरी सुद्धा मिळाल्यानंतर या विचारांना जोर मिळाला .त्यात प्रकृतीचे सृष्टीचे वाटेल तसे नुकसान करून त्याचा स्वतःचा व्यापार वाढू लागला त्याच्या विकासाला व त्याच्या लोभाला आकांक्षाना काही सुमारच राहिला नाही आणि त्याला आळा घालायला त्याच्याइतके बुद्धिवान उपस्थित नव्हते. त्यामुळे स्वार्थी मनुष्याचा विश्वासच नव्हता की कधीही पृथ्वी ही चैतन्यमय आणि जिवंत असल्याचा पुरावा मिळेल .

परंतु ज्ञानविज्ञानाच्या या विकसित होणाऱ्या प्रवाहाबरोबर याही बाबतीत वैज्ञानिक संशोधन झाले आणि काही वर्षांमध्ये वैज्ञानिक दृष्ट्या पृथ्वी एक जीवन तंत्र आहे की आपल्या वातावरणाचे निर्माण करते आणि त्याचे संतुलन करण्याची क्षमता सुद्धा तिच्यात आहे हे सिद्ध करण्याचा सतत प्रयत्न होत आहे.

हळूहळू पूर्वीच्या बुद्धी वादाने उपस्थित झालेल्या दुष्परिणामांचे परिणाम पृथ्वीवरील मनुष्य भोगायला लागलेला होता. आणि अजूनही भोगतोच आहे. जमिनीची होणारी धूप ,जंगलांची तोड तेथील जंगलांवर आधारित असणारे प्राणिमात्रांच्या आयुष्यातील ढवळाढवळ, गाडी जैवविविधतेवर झालेला परिणाम, नद्या-नाल्यांचे बिघडलेले स्वास्थ्य, पाण्याचे, हवेचे ,आवाजाचे झालेले प्रदूषण आणि त्यामुळे मानवी जीवनावर होणारा दीर्घकालीन परिणाम अशी अनेक प्रकारची फळे आज आपण भोगतो आहोत. लहान मुलांना गोष्टी सांगण्यासाठी लागणारी’ चिमणी ‘सुद्धा दिसेनाशी झाली आहे. नदी, कुत्रा ,मांजर यासारख्या सवंगड्यांना छोटी मुले मुली आहेत. आणि लोकसंख्यावाढीला तर सुमारच नाही. शहरे महानगरे ओसंडून वाहतात आहे दुरून दिसणाऱ्या काडी पेटी सारख्या घरातून लोक राहतात आहे. आणि नकळत पृथ्वीसारखे हवामान शोधण्यासाठी, रहाण्यासाठी योग्य एखादी जागा सापडते आहे का.? या दिशेने मानवाची बुद्धी वळलेली आहे.

याच दिवसात अमेरिकेच्या अंतराळ विषयक संशोधन करणाऱ्या नासा केंद्रात कार्य करीत असणाऱ्या जेम्स लव्ह स्टोक यांना मंगळ ग्रहावर जीवनाचे शक्यता शोधून काढण्याचे कार्य देण्यात आले होते या कार्यानुसार त्यांनी मंगळ ग्रहाच्या वातावरणाचे अध्ययन सुरू केले त्यावरून त्यांना मिळालेल्या निष्कर्षाची त्यांनी पृथ्वीवरील वातावरण याची तुलना केली आणि त्यांच्या आश्चर्याला सीमा राहिली नाही .त्यांना दिसून आले की मंगळ ग्रहाच्या वायूमंडलात फार कमी ऑक्सिजन ार अधिक प्रमाणात कार्बन-डाय-ऑक्‍साईड व जवळपास नगण्य रूपात मिथेन गॅसआहेत. याउलट पृथ्वीवरच्या वातावरणात जास्त प्रमाणात ऑक्सिजन कमी प्रमाणात कार्बन डायऑक्साइड व समतोल प्रमाणात मिथेन वायू आहे. डॉक्टर लेव स्टोक यांच्या माहितीनुसार गेल्या 40 कोटी वर्षात सुर्याचे उष्णतामान सुमारे 25 टक्क्यांनी वाढले आहे आणि आपल्या सौर मंडळातील प्रत्येक ग्रहाचे उष्णतामान ही 25% एवढे वाढले आहे पण केवळ पृथ्वीच अशी आहे की जिथे उष्णतामान तसेच आहे यावरून त्यांनी निष्कर्ष काढला की ,”पृथ्वी ही एखाद्या जिवंत प्राण्याप्रमाणे विचार व स्वप्न बंधनाच्या माध्यमाने आवश्यकतेनुसार आपल्या वातावरणाच्या तापमानाला संतुलित ठेवते आणि त्यामुळे इथे राहणारे प्राणी मात्र सुखाने जगू शकतील आणि त्यांचे जीवन निर्वेधपणे चालत राहील.” त्यांनी आपल्या या नव्या विचारात ग्रीस देशात व्याख्यानांच्या द्वारे केले. त्यात त्यांनी पृथ्वी मातेला ग्रीक पुराणात वर्णन केलेल्या “देवी गिया “तिच्या नावाच्या आधाराने” गिया हायपोथेसिस “असे नाव दिले. आपल्या वातावरणामध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डाय-ऑक्साइड यांचे संतुलन करताना काय काय घडामोडी होतात हेही दृष्टिपथास आले आहे. आणि म्हणूनच अजूनही आपण प्रकृतीचे आणि सृष्टीचे संतुलन कायम राहून बरे जीवन जगू शकतो.

अथर्ववेदात एक उद्घोषणा आहे, त्याचा अर्थ असा की हे पृथ्वीवर माते आपला जो मध्यभाग आहे वनविभाग आहे ,तसेच आपल्या शरीरातून जे पोषण युक्त पदार्थ प्रादुर्भूत होत असतात त्यात तू आम्हाला प्रतिष्ठित कर .ही पृथ्वी आमची आई आहे व आम्ही तिचे पुत्र आहोत ,पर्जन्य आमचा पिता आहे .तो आम्हाला पूर्ण संतुष्ट करो.

फ्रेंड्स ! आज विज्ञानही याच चिंतनाचे प्रतिपादन करीत असल्याचे दिसते. आपणही या घडणीशी, या सृष्टीशी असाच व्यवहार करावा जसा एक पुत्र आपल्या माते भरभर करीत असतो.
( संदर्भ : मासिक अखंड ज्योती. सप्टे २००८)

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER