ईस्लापुर: थरार-सहस्त्रकुंड धबधब्यात पडलेले तिघे बेपत्ता… अडकलेला एक पर्यटक वाचला.

Nanded

ईस्लापुर वार्ताहर : तेलंगाणा राज्यातील हैद्राबाद येथील पर्यटक सहस्रकुंड धबधबा पाहण्यासाठी आले असता आठ पर्यटका पैकी चार पर्यटक धबधबा जवळुन पाहताना पैनगंगा नदिच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने पाण्यात वाहुन जात चौघे कुंडात पडले असुन त्यापैकी तीन जण बेपता आहे.तर वरुन पडुनही एकाचा जिव वाचल्याने त्यांना बाहेर काढण्यास भोईना यश आले आहे.

तेलंगाणा राज्यातील हैद्राबाद येथील रहिवासी असलेल्या आठ जणांनी सहस्रकुंड धबधबा पाहण्यासाठी दि.15 आँक्टोंबर मंगळवार रोजी सकाळी चार चाकी वाहनाने आले होते. त्यापैकी चार जण हे या धबधब्याच्या आतील भागात उतरले होते.व चार जण वरुन धबधबा पाहत होते. परंतु चार जण आत उतरुन धबधबा पाहत असताना अचानक पणे पैनगंगा नदिच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने या लाटेत ते चार जण वरुन कुंडात पडले. त्यापैकी तिघे जण पाण्यात वाहुन गेल्याने बेपता असुन एक जणाला पोहता येत असल्याने त्यांने कुंडाच्या बाजुच्या दगड भागाला धरल्याने नदिम नावाच्या हा पर्यंटक वाचला असुन याला तीन तास कडेला अडकुन बसावे लागले. हा एक पर्यटक सुमारे तीन तास कडेला अडकला होता.

या अडकलेल्या एका जणाला भोईच्या साहयाने बाहेर काढण्यात यश आले आहे.परंतु त्यातील तीन जणांना काढण्यात अदयापही यश आले नसुन पाण्याची पातळी मोठया प्रमाणावर वाढल्याने तीघांचा अदयापही पता लागला नाही.

बेपता असलेल्या रफियोदीन ,आक्रम,सोहेल हे तिघे अदयापही बेपता असुन त्यांचा शोध घेण्याचे काम चालु आहे.या घटनेची माहिती ईस्लापुर भागातील नागरिकांना कळताच सहस्रकुंड धबधबा या पर्यटन स्थळी बघणायाची गर्दी मोठया प्रमाणावर जमली होती.तर नदिच्या कडेला अडकलेल्या नदिम या पर्यटकाला या ठिकाणी मच्छिमार करणारे भोई समाजाचे रामराव गंटलवाड इरेगाव,दता चोकलवाड,देविदास भटेवाड,पाडुरंग मागीरवाड सहस्रकुंड,सयाजी तोकलवाड,लक्ष्मण टोपलवाड यांनी अतोनात प्रयत्न करुन पाण्याच्या प्रवाहातुनही बाहेर काढण्याची कामगीरी बजावली आहे.तर उर्वरित बेपता तिघांचा शोध घेण्याचे काम चालु असल्याची माहिती ईस्लापुर पोलीसांनी दिली आहे.