इशरत जहाँ बनावट चकमक खटल्यात सर्व पोलीस सुटले

Maharashtra Today
  • आरोपी पोलीस अधिकाºयांना कोर्टाने केले आरोपमुक्त

अहमदाबाद: ठाण्याजवळील मुंब्रा येथील इशरत जहाँ या १९ वर्षांच्या कॉलेज युवतीसह एकूण चार जणांना ‘लष्कर-ए-तैयबा’चे अतिरेकी असल्याच्या सं़शयावरून अहमदाबादजवळ १७ वर्षांपूर्वी एका कथित बनावट चकमकीत ठार केल्यावरून दाखल केलेल्या खटल्यात आरोपी असलेल्या गुजरात पोलीस दलाच्या सर्व अधिकार्‍यांना  येथील ‘सीबीआय’ विशेष न्यायालयाने आरोपमुक्त केले आहे.

विशेष न्यायालयाचे न्यायाधीश विपुल रावल यांनी बुधवारी गुजरातचे माजी पोलीस महानिरीक्षक जी. एल. सिंघल, निवृत्त पोलीस निरीक्षक तरुण बारोट आणि राखीव पोलीस दलाचे कमांडो अनाजु चौधरी या तीन आरोपींना आरोपमुक्त केले. याआधी याच न्यायालयाने माजी पोलीस महानिरीक्षक डी. जी. वंजारा, पी. पी. पांडे व एन.के. अमीन या आरोपी पोलीस अधिकाºयांना आरोपमुक्त केले होते.

खटल्यात एकूण सात पोलीस अधिकारी आरोपी होते. त्यापैकी सहा आरोपमुक्त झाले आहेत. सातवे आरोपी जे. जी. परमार यांचे गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये निधन झाले होते. अशा प्रकारे ‘सीबीआय’ने अपील केले नाही तर हा खटला आता संपल्यात जमा आहे. ‘सीबीआय’ अपील करण्याची शक्यता दिसत नाही. कारण तीन आरोपींना आरोपमुक्त करण्याच्या निर्णयाविरुद्ध ‘सीबीआय’ने अद्याप अपील केलेले नाही.

राज्य सरकारने खटला चालविण्यास संमती दिलेली नससल्याने एक तर आपल्याला आरोपमुक्त कारवे अथवा आपल्याविरुद्धचा खटला काढून टाकावा, असा अर्ज या आरोपी पोलीस अधिकाºयांनी केला होता. मुळात या पोलीस अधिकाºयांवर नोंदविलेल्या गुन्ह्यातच काही दम नाही व ती चकमकही बिलकूल बनावट नव्हती, असा स्पष्ट निर्वाळा देत न्यायालयाने म्हटले की, ‘लष्कर-ए-तैयबा’चे चार खतरनाक अतिरेकी मोटारीने निघाले आहेत व महत्वाच्या राजकीय पुढाºयांना (त्यावेळचे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी) ठार करण्याचे कारस्थान त्यांनी आखले आहे, अशी पक्की गुप्तवार्ता मिळाल्याने पोलिसांनी ती मोटार अडविली होती. त्यामुळे या पोलीस अधिकाºयांनी जे काही केले ते त्यांचे कर्तव्य होते व कर्तव्य बजावताना केलेली कृती हा गुन्हा ठरत नाही.

दि. १५ जून, २००४ रोजी झालेल्या या चकमकीत इशरत जहाँ, जावेद शेख, अमजदअली अकबरअली राणा व  झीशान जोहर अशा चार व्यक्ती ठार झाल्या होत्या (Ishrat jahan fake encounter). यातील राणा व जोहर पाकिस्तानी नागरिक होते. नंतर उच्च न्यायालयाने नेमलेल्या चौकशी समितीने ही चकमक बनावट असल्याचा निष्कर्ष काढला होता व त्यातून पोलीस अधिकाºयांवर हा खटला दाकल केला गेला होता.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button