इशरत जहाँ बनावट चकमक प्रकरण : तीन पोलीस अधिकाऱ्यांची निर्दोष मुक्तता

Ishrat Jahan - Maharastra Today

नवी दिल्ली : देशभरात गाजलेल्या गुजरातमधील सन २००४ मध्ये झालेल्या इशरत जहाँ बनावट चकमक प्रकरणी अहमदाबाद येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. या प्रकरणात अहमदाबाद येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आरोपी असलेल्या तीन पोलीस अधिकाऱ्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाने आज हा निकाल दिला.

इशरत जहाँ बनावट चकमक प्रकरणात आयपीएस अधिकारी जी.एल. सिंघल यांच्यासह सेवानिवृत्त अधिकारी तरुण बारोट व अनाजु चौधरी तीन पोलीस अधिकाऱ्यांवर आरोप करण्यात आले होते. २० मार्च रोजी पोलीस महानिरीक्षक जी.एल. सिंघल, निवृत्त पोलीस अधिकारी तरुण बारोट व चौधरी यांनी ‘परवानगी न मिळाल्यामुळे न्यायालयीन कार्यवाही रद्द करण्यासाठी’ न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

काही दिवसांपूर्वीच आयपीएस अधिकारी जी. एल. सिंघल यांच्यासह ३ आरोपी पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध खटला भरण्याची परवागी गुजरात सरकारने नाकारली असल्याची माहिती केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) एका न्यायालयाला दिली होती. या पार्श्वभूमीवर, २० मार्च रोजी पोलीस महानिरीक्षक जी.एल. सिंघल, निवृत्त पोलीस अधिकारी तरुण बारोट व चौधरी यांनी ‘परवानगी न मिळाल्यामुळे न्यायालयीन कार्यवाही रद्द करण्यासाठी’ न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्याही आधी २०१८ मध्ये माजी प्रभारी पोलीस महासंचालक पी.पी. पांडे यांनाही या खटल्यातून मुक्त करण्यात आले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button