इशांतचा एकच षटकार, पण आहे खासमखास!

ishant Sharma

कोणत्याही क्रिकेटपटूसाठी आपला 100 वा कसोटी सामना खास असतो. तो संस्मरणीय बनवण्याचा त्यांचा आटोकाट प्रयत्न असतो. त्यांचे चाहतेही आपला आवडता खेळाडू 100 व्या सामन्यात काय स्पेशल करणार याकडे डोळे लावून बसलेले असतात. काही दिवसांपूर्वीच इंग्लंडच्या जो रुटने (Joe Root) आपल्या शतकी सामन्यात द्विशतकी खेळी केली होती.आता अहमदाबादचा कसोटी सामना हा भारताचा जलद गोलंदाज इशांत शर्माचा (Ishant Sharma) 100 वा सामना (100 test) आहे.

आता इशांत तर गोलंदाज आहे त्यामुळे त्याच्याकडून शतक- अर्धशतकाची अपेक्षा करणे गैर आहे पण गोलंदाजीत त्याच्याकडून अपेक्षा करणे स्वाभाविक आहे परंतु अक्षर पटेल व रवीचंद्रन अश्विन यांनी मिळुन दोन्ही डावात 9-9 गडी बाद केल्याने त्याच्या वाट्याला बळीसुध्दा येऊ दिलेले नाहीत. दुसऱ्या डावात तर इशांतला गोलंदाजीसुध्दा करायला मिळाली नाही. आपल्या 100व्या सामन्यात 10 धावा आणि एकच बळी अशी त्याची कामगिरी राहीली आहे तरीसुध्दा इशांतसाठी आणि त्याच्या चाहत्यांसाठी हा सामना संस्मरणीय राहिला आहे. कारण 100 कसोटी सामन्यात इशांतने पहिल्यांदाच षटकार लगावला आहे. एवढेच नाही तर एकूणच आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या 194 सामन्यांतला त्याचा हा पहिलाच षटकार आहे. 99 कसोटी, 80 वन डे आणि 14 टी-20 इंटरनॅशनल खेळूनही तो आतापर्यंत षटकार लगावू शकलेला नव्हता. तब्बल 2677 चेंडू खेळूनही त्याला चेंडू उंच सीमापार भिरकावता आला नव्हता पण गुरुवारी कसोटी क्रिकेटमधील आपला 2465 वा चेंडू खेळताना त्याने षटकार लगावला आणि त्याच्या या षटकाराने त्याच्यासाठी हा 100 वा कसोटी सामना संस्मरणीय बनवला.

जॕक लीच (Jack leach) याला त्याने लाँग आॕफवर हा षटकार लगावला आणि आॕस्ट्रेलियाच्या ग्लेन मॕकग्राचा (Glen McGrath) सर्वाधिक कसोटी सामने षटकाराविना खेळायचा विक्रम अबाधित राहिला. ग्लेन मॕकग्राने आपल्या 102 व्या कसोटीत पहिला आणि एकमेव षटकार लगावला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER