इशांत शर्मा पोहाचला 300 बळींच्या क्लबमध्ये!

ishant sharma

इशांत शर्मा (Ishant Sharma) हा 300 कसोटी बळींचा (300 Test wickets) टप्पा गाठणारा केवळ तिसराच भारतीय जलद गोलंदाज ठरला आहे. चेन्नई कसोटीत सोमवारी इंग्लंडच्या डॕन लाॕरेन्सला (Dan Lawrence) पायचीत बाद करुन त्याने हा टप्पा गाठला. यासह तो कपिल देव व झहीर खान या भारतीय जलद गोलंदाजांच्या पंक्तीत जाऊन बसला. रवीचंद्रन अश्विन, !अनिल कुंबळे व हरभजन सिंग हे फिरकीपटूसुध्दा 300 पेक्षा अधिक विकेटचे धनी आहेत.

इशांतने आपल्या 98 व्या सामन्यात हा टप्पा गाठला.यासह तिनशे कसोटी बळी पूर्ण करणाऱ्या गोलंदाजात तो सर्वात संथ ठरलाय. असे असले तरी गोलंदाजांमध्ये सर्वाधिक सुधारणा त्याने आपल्या कामगिरीत दाखवली आहे. 2018 पासूनच्या 18 कसोटी सामन्यात त्याने फक्त 19.14 च्या सरासरीने बळी मिळवले आहेत. यासह त्याची सरासरी आता 32.39 आहे.

इशांतच्या कारकिर्दीचे दोन भाग केले तर पहिल्या 48 कसौटीत त्याची सरासरी 38.44 होती तर नंतरच्या 49 सामन्यात त्याची सरासरी 27.21 आहे. म्हणजे दुसऱ्या टप्प्यात त्याने विलक्षण सुधारणा दाखवली आहे. इतर कोणत्याही गोलंदाजाने एवढी आपली कामगिरी सुधारलेली नाही.

तिनशे कसोटी बळींचा टप्पा केंव्हा गाठला?

गोलंदाज डाव बळी

 • मुरलीधरन — 91 — 302
 • अश्विन—.– 101 — 300
 • डेनीस लिली — 107 — 301
 • रिचर्ड हॕडली — 110 — 302
 • अॕलन डोनाल्ड – 112 — 300
 • डेल स्टेन — 113 — 301
 • इम्रान खान — 114 — 302
 • माल्कम मार्शल — 114 — 300
 • अनिल कुंबळे — 116 — 300
 • शेन वाॕर्न — 116 — 300
 • वकार युनूस — 117 — 300
 • वसिम अक्रम — 121 — 300
 • इयान बोथम — 122 — 302
 • फ्रेड ट्रुमन — 123 — 301
 • ग्लेन मॕकग्रा — 123 — 301
 • रंगना हेरथ — 124 — 300
 • कर्टली अँब्रोज — 130 — 300
 • हरभजन सिंग — 132 — 302
 • मिचेल जाॕन्सन — 132 — 301
 • शाॕन पोलाॕक — 135 — 302
 • मखाया एन्टिनी — 138 — 301
 • कपिल देव — 139 — 300
 • लान्स गिब्ज — 140 — 300
 • टीम साऊथी — 142 — 300
 • ब्रेट ली — 143 — 302
 • नैथन लियन — 147 — 301
 • जेम्स अँडरसन — 148 — 303
 • बाॕब विलीस — 149 — 300
 • कोर्टनी वाॕल्श — 149 — 300
 • डॕनियल व्हेट्टोरी — 150 — 300
 • स्ट्युअर्ट ब्रॉड — 151 — 307
 • चामिंडा वास — 155 — 301
 • मार्ने मोर्केल — 157 — 301
 • झहीर खान — 160 — 300
 • इशांत शर्मा –177 — 300


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER