हे सरकार गरिबांचे की दारूवाल्यांचे? चित्रा वाघ

chitra wagh

सरकारने मंदिरांच्या आधी बार सुरू केले. दारूवाल्यांना परवान्यावर ५० टक्के सवलत दिली. कोरोनाच्या काळात सामान्य जनता प्रचंड आर्थिक अडचणीत असताना सरकार दारूवाल्यांवर इतके मेहरबान का? हे सरकार गरिब जनतेचे आहे की दारूवाल्यांचे? असा प्रश्न भाजपाच्या (BJP) प्रवक्त्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केला.

कोरोनाच्या काळात हॉटेल व्यवसायिक,लहान-मोठे व्यापारी आर्थिक अडचणीत आले होते. वाढीव वीज बिळात सवलत द्या, मालमत्ता कर कमी करा, अशी जनतेची मागणी होती. यासाठी लोक रस्त्यावर उतरले होते पण सरकारने सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी काही केले नाही मात्र, दारूवाल्यांना परवान्यात ५० टक्के सूट दिली! दारूवाल्यांची सेवा, हाच महाविकास आघाडी सरकारचा किमान समान कार्यक्रम आहे का? मंत्री दारूवाल्यांवर किंवा दारूवाले काही मंत्र्यांवर मेहरबान आहेत का? असा प्रश्न वाघ यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER