हे सरकार तुकडे तुकडे गँगचे आहे काय?, आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका

Ashish Shelar & Uddhav Thackeray

मुंबई : मेहक प्रभू प्रकरणावरून पुन्हा एक नवीन वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया परिसरात झालेल्या सीएए विरोधी आंदोलनावेळी मेहक प्रभू या तरुणीने फ्री काश्मीरचं पोस्टर झळकावलं होतं. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी सी रिपोर्ट दाखल केला आहे. त्यावरून भाजपाचे (BJP) नेते आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी “हे सरकार तुकडे तुकडे गँगचे आहे की काय?,” असा सवाल उपस्थित करत ठाकरे सरकारवर (Thackeray Government) हल्लाबोल केला आहे.

भाजपाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी ट्विट करत काही प्रश्न सरकारला विचारले आहेत. “कसाबचा पाहुणचार बिर्याणीने केला. कन्हैया ज्यांना आपलासा वाटतो. त्या आघाडीच्या ठाकरे सरकारचे आता शहरी नक्षलवाद्यांना रेड कार्पेट? आझाद काश्मीरचा नारा देणाऱ्या मेहक प्रभूच्या “हातात” मुंबई पोलीस आता निर्दोषत्वाचा दाखला देणार? हे सरकार तुकडे तुकडे गँगचे आहे की काय?,” असा सवाल उपस्थित करत शेलार यांनी ठाकरे सरकारचा समाचार घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER