‘ही मुख्यमंत्री यांना केलेली दिशाभूल की त्यांचीच दिशाभूल’?, भाजपची मुख्यमंत्र्यांवर टीका

Keshav Upadhyay - Uddhav Thackeray

मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यात आणि देशात कोरोना (Corona) रुग्णांची आणि मृत्यूंची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्यभरात कडक निर्बंध घातले आहेत. तसेच कोरोना ही नैसर्गिक आपत्ती समजून महाराष्ट्रातील गरीब, दुर्बलांना लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात अर्थसहाय्य करा, अशी विनंती करणारे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पाठवलं. यावरून भाजपनं (BJP) मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले आहे.

पैसे देणार आहेत. जे की त्यांच्या हक्काचेच आहेत. त्याहुन अधिक असे अर्थिक सहाय्य मुख्यमंत्री देत नाहीत’, असं म्हणत भाजप महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले आहे.

ही मुख्यमंत्री यांना केलेली दिशाभूल की त्यांचीच दिशाभूल? वर्षभरापासून केंद्र सरकारकडून आपत्ती निवारण कायद्याच्या अंतर्गत काम चालू आहे. गेल्या वर्षीचा लॉकडाऊनचा आदेश पाहा. अचानक नैसर्गिक आपत्ती जाहीर करा अशी मागणी करण्याची गरज राज्य सरकारला का वाटली? आणि आपत्ती प्रतिसाद निधीतून मदत करण्याची परवानगी मागितली जात आहे?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी एकमात्र महाराष्ट्र राज्य सोडता प्रत्येक राज्यांनी आपापल्या जनतेला अर्थसहाय्य केलेले (केवळ सहानुभुतीचे पोकळ शब्द आणि आश्वासने दिली नव्हती) मग सरकारला का शक्य नव्हते? आत्ताही एवढ्या उशीरा मदत करण्याची उपरती झाल्यावर ही मदत करण्यात तांत्रिक अडचण असल्याचे का भासवले जात आहे, असंही उपाध्ये यांनी विचारलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button