‘नियोजना’च्या अभावामुळे लसींचा तुटवडा निर्माण झालाय का?

Maharashtra Today

राज्यात कोरोनाच्या (Coronavirus)वाढत्या साथी बरोबरच लसीकरणाचा तुटवडा निर्माण झाल्यानं चित्र गंभीर बनलंय. केंद्रीय आरोग्यमंत्री आणि राज्याचे आरोग्यमंत्री यामुळं एकमेकांसमोर आलेत. एकमेकांकडे दोघेही बोटे दाखवत असताना राज्यशासनाला मिळालेल्या लशींचे नियोजन का लावता आलेलं नाही (shortage of vaccines due to lack of planning)? असा प्रश्न जनसामान्य विचारत आहेत. बिगर भाजप शासित राज्यांनी लसीचा तुटवडा पडत असल्याचा सुर लावून धरलाय. दिल्ली, पंजाब, महाराष्ट्र ही राज्यं या बाबती आघाडीवर आहेत.

महाराष्ट्रातली परिस्थीती काय?

राज्यात लसीचा तुटवडा जाणवायला सुरुवात झालीये. लसी अत्यल्प प्रमाणात उपलब्ध असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे(Rajesh Tope) म्हणाले होते. अशातच राजधानी मुंबईतल्या सर्वात मोठ्या लसीकरण केंद्रावर तुटवडा जाणवला. यात २६ लसीकरण केंद्र(26 Vaccination Center) बंद करावी लागली. मुंबईतील सर्वात मोठं लसीकरण केंद्र असलेल्या बी.के.सी. म्हणजेच (बांद्रा कुर्ला कॉम्पेलेक्स) कोविड सेंटरमध्ये आज सकाळी कोरोना लसीचा साठा संपला. पालिकेने शेकडो लोकांना फोन करून कोरोनाची लस घेण्यासाठी बीकेसी केंद्रावर बोलावलं होतं. त्यानुसार शेकडो लोक बीकेसीला आले होते. मात्र, केवळ पाच हजारच लस असल्याने आधी आलेल्या नागरिकांना त्या देण्यात आल्या. त्यानंतर लस संपल्याचं सांगत तसा बोर्डही केंद्रावर लावण्यात आला. त्यामुळे नागरिक प्रचंड संतप्त झाले.

नागरिकांनी व्यक्त केला संताप

लसीकरणासाठी नागरिकांना बराच वेळ रांगेत उभं रहावं लागतं. मोठ्या प्रतिक्षेनंतर त्यांचा लसीकरणासाठी नंबर लागतो. दिवसभर रांगेत थांबल्यानंतर लसी संपल्या आता घरी जा म्हणाल्यावर नागरिकांना संताप येणं सहाजिक आहे. बी.के.सी.त हेच घडल्याचं पहायला मिळालं. अपुरा साठा होता तर रांगेत उभं का केलं? लस अपुऱ्या होत्या तर तेवढ्याच लोकांना फोन करून बोलवायचं होतं, सरसकट सगळ्यांना का बोलावलं? साठा संपल्याचं फोनवरून का कळवलं नाही? असे एक ना अनेक प्रश्न नागरिकांकडून करण्यात आले. त्यामुळे या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झालीये.

मनपा म्हणते…

लसीकरणाच्या तुटवड्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी मुंबई मनपाचे सहाय्यक आयुक्त पुढे सरसावले. मुंबई महापालिकेचे सहाय्यक आयुक्त किरण दिहगावकर यांनी ट्विट करत कोरोना लस संपलेल्या लसीकरण केंद्रांची माहिती दिली. ट्विटनुसार मुंबईतील वांद्रे बीकेसी कोविड सेंटर, सायन रूग्णालय, सेव्हन हिल हॉस्पिटल, कस्तुरभा रूग्णालय, कूपर हॉस्पिटल, सर्वादय रूग्णालय माहिम, पोदार रूग्णालय, क्रांती सावित्राबाई फुले रूग्णालय याठिकाणी लस उपब्लध नसणार आहे. असं चित्र निर्माण झालंय.

जयंत पाटलांची बोचरी टीका

पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्र्यांची ऑनलाईन बैठक घेतली. यावेळी कोरोनाशी लढण्यासंदर्भात मार्गदर्शन त्यांनी केलं. ११ एप्रिल महात्मा फुले जयंती ते १४ एप्रिल बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे. यादरम्यानच्या काळात आपण लसीकरण पर्व साजरं करावं जास्तीच्या लसी द्याव्यात असं आवाहन त्यांनी राज्यांना केलं.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंधारण मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मात्र पंतप्रधानांच्या विधानावर बोचरी टीका केली ते म्हणाले, “ज्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त झाला, तिथे जास्त लस दिली पाहिजे. महाराष्ट्राची मागणी ४० ते ५० लाख इतकी होती. मात्र केंद्राकडून फक्त साडे सतरा लाख लस मिळाल्या. या लसी लवकर संपतील. आजही बीकेसीच्या कोरोना लसीकरण केंद्रात लस नाही. तिथे लोकं लस घेण्यासाठी गर्दी करत आहेत. पण लस उपलब्ध नसेल तर कसं होणार?” असा सवाल ही त्यांनी शेवटी उपस्थीत केला.

जयंत पाटील पुढं म्हणाले, ” लस वाटप नियंत्रण हे केंद्राच्या हातात आहे. केंद्र सरकार नियोजन करण्यात अपयश दिसत आहे. पंतप्रधान मोदी जे सांगितली ते देश करायला तयार आहे. त्यांनी थाळी वाजवायला सांगितली, आम्ही ते केलं. त्यावर टीका केली नाही. पण आता देशात कोरोना लसीचा फक्त पुरवठा झाला पाहिजे. आता आम्ही टीका उत्सवही करु. पण त्यासाठी लस द्या. ती नसेल तर लस उत्सव वेळ बदला,” असा सल्लाही जयंत पाटीलांनी पंतप्रधानांना दिला.

राज्यात टीका टिप्पणीचं राजकारण सुरु असलं तरी प्रत्यक्षात वास्तव भीषण बनत चाललंय. औषधांची साठेबाजारी सुरु आहे. औषधं मिळत नाहीयेत. दुसऱ्या लाटेच्या भीषण परिस्थीतीमुळं बेड देखील उपलब्ध होत नाहीयेत. तर दुसऱ्या बाजूला तीन महिने कडक लॉकडाऊन करणार असल्याचे संकेत मदत आणि पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार यांनी दिलेत. मुख्यमंत्र्यांना तशी शिफारस करणार असल्याचेही ते म्हणालेत. राज्यात कोरोनाचा कहर, लॉकडाऊनची भीती आणि लसींचा तुटवडा यामुळं गंभीर वातावरण तयार झाल्याचं चित्र आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button