पब, पार्टी गँग मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठी आहे का?- आशिष शेलार

Ashish Shelar - Uddhav Thackeray

मुंबई :  कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर टाळेबंदी शिथिलीकरणाच्या टप्प्यात मिळालेल्या परवानगीचा गैरफायदा घेत मुंबईतील ‘नाईट क्लब’मध्ये रात्रभर सुरू असलेल्या धिंगाण्यामुळे कोरोनाचा धोका वाढू लागला आहे. यावरून आता भाजपा नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

शेलार आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की , ‘बार, पबमुळे कोरोना वाढला. आता नशा उतरली? पालिकेला नाईट कर्फ्यू लावायची वेळ आली. पब, पार्टी गँगने वेळ वाढवून मागितली होती…या गँगला आता जबाबदार धरणार का? मुख्यमंत्री आरोग्याचे आवाहन करतात… तर पब, पार्टी गँग अनधिकृतपणे धिंगाणा घालतात! ही गँग मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठी आहे का?’ असे आशिष शेलार यांनी ट्विट केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER